Nashik News : जेलरोडला गोदातीरी श्री संतधाम भूमिपूजनास संतांचा मेळा

Sant mandali
Sant mandaliesakal

नाशिक : भूलोकीचे देव म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या सकल संत चरणाचे दर्शन भाविकांना एकाच छताखाली व्हावे, यासाठी श्रीसंत सेना एकता बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जेल रोड गोदेच्या पवित्र तीरावर आणि पंचक तीर्थक्षेत्री श्रीक्षेत्र संतधाम साकारण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. १५) भूमिपूजन होणार असून संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीपासून श्री गाडगे महाराजांपर्यंत आणि महर्षी वाल्मीकी ऋषींपासून संत जनाबाईपर्यंतच्या दिव्य विभूतींच्या प्रतिमांचे दर्शन संतधाम येथे भाविकांना होणार आहे. (Saints Mela at Jail Road at Godavari shore Shri Santadham Bhumi Pujan Nashik News)

पत्रिका
पत्रिकाesakal

सर्व संतांचे दर्शन एकाच छताखाली घेता यावे याकरिता जेल रोड परिसरातील पंचक गावात श्री क्षेत्र संतधाम उभारण्याचा संकल्प श्री संतसेना एकता बहुउद्देशीय संस्थेने केला आहे. नियोजित वास्तु मंदिराचा भूमिपूजन पंचक गाव येथील आनंदेश्वर मंदिराशेजारी गुरुवारी सकाळी नऊला होणार आहे. श्री. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन आश्रमाचे माधवगिरी महाराज व स्वामी संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. महासंघाचे किरण बिडवे, संजय वाघ, सुभाष बिडवई, रमेश बिडवे, देवेंद्र तासकर, मनोज वाघ, विजय पंडित, एकनाथ शिंदे, राजेंद्र महाले, सुधाकर गायकवाड, कीर्ती जाधव प्रयत्नशील आहेत.

असे असणार श्री संतधाम

श्री संतधामची वास्तु भवनाची रचना ही बहुमजली असणार आहे. सभामंडपासह प्रशस्त सभागृह तसेच अनेक दालन असेल. प्रभू रामचंद्र, श्री सद्गुरू दत्तात्रेय, विठ्ठल रखुमाई यांच्या देवालयासह संतश्रेष्ठ आद्यगुरू रामानंदाचार्य महाराज, महर्षी वाल्मीकी ऋषी, श्री. समर्थ रामदास स्वामी, चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री स्वामी समर्थ, संत गजानन महाराज, संत एकनाथ महाराज, जगनाडे महाराज, सद्गुरू जंगलीदास महाराज, सद्गुरू जनार्दन स्वामी, श्री. महात्मा बसवेश्वर स्वामी

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Sant mandali
Rajya Natya Spardha : ‘श्रॉडिंगर्स कॅट’मधून उलगडले डॉनचे अंतरंग!

श्री. स्वामी गगनगिरी महाराज, संत भगवानबाबा, संत तुकाराम महाराज, संत सेना महाराज, संत रोहीदास महाराज, संत सावता महाराज, संत बाळूमामा, सद्गुरू शंकर महाराज, संत गोरोबा महाराज, संत नरहरी महाराज, संत कबीर, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा महाराज, संत गाडगेबाबा महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्ती महाराज, संत नगाजी महाराज, संत तुकडोजी महाराज, संत जिव्हेश्वर महाराज, संत जनाबाई आदी मूर्तींचे दर्शन होईल.

"भक्ती मार्गातून एकात्मता, सामाजिक बंधुभाव, समता आणि मानवतेचे शिक्षण देत समाज जागृती करण्याचे कार्य संतांनी केले. याच विचारधारेची प्रेरणा श्रीक्षेत्र संतधामही भाविक भक्तांना देईल."-भगवानराव बिडवे, अध्यक्ष, नाभिक एकता महासंघ

Sant mandali
Dr. Babasaheb Ambedkar यांचा पुतळा का हटवला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com