Rajya Natya Spardha : ‘श्रॉडिंगर्स कॅट’मधून उलगडले डॉनचे अंतरंग!

Actors of Creative Mind Foundation Trust presenting scenes from the play 'Schrödingers' at the Amateur Marathi State Drama Competition.
Actors of Creative Mind Foundation Trust presenting scenes from the play 'Schrödingers' at the Amateur Marathi State Drama Competition.esaka

नाशिक : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची आतापर्यंतची वाटचाल, त्याचे एकूणच व्यवहार, दिनक्रम आदींबाबत सर्वसामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघावयास मिळते. ही उत्सुकता संपविण्याचा प्रयत्न आणि रंगमंचावर क्राईम, सस्पेन्स आणि थ्रिलर कलाकृती सादर करण्याचा एक यशस्वी प्रयोग म्हणजे ‘श्रॉडिंगर्स कॅट’ हे दोन अंकी नाटक. (61st haushi Rajya Natya Spardha Don inner self revealed from Schrödingers Cat Nashik news)

राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सुरू असलेल्या ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोमवारी (ता. १२) येथील क्रिएटिव्ह माईंड फाउंडेशन ट्रस्टतर्फे ‘श्रॉडिंगर्स कॅट’ हे नाटक सादर झाले. कुख्यात डॉनच्या जीवनावर आधारित कथानक असल्याने त्यावर स्वाभाविकच हिंदी चित्रपटांचा प्रभाव जाणवतो.

मात्र, तरीदेखील रंगमंचाच्या मर्यादा लक्षात घेता राहुल गुजराथी यांनी अत्यंत जबाबदारीने या नाटकाची संहिता लिहिली असून, दिग्दर्शन व वेशभूषेची बाजूही त्यांनीच सांभाळली आहे. कदाचित त्यामुळेच या नाटकात एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असेच विविध प्रसंग, संवाद आणि सादरीकरणातही हाच प्रभाव जाणवतो.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Actors of Creative Mind Foundation Trust presenting scenes from the play 'Schrödingers' at the Amateur Marathi State Drama Competition.
Dengue Disease : डेंगी रुग्णांमध्ये झपाट्याने घट!

गुन्हेगारी जगतातील विविध घडामोडींचा वेध घेतानाच त्यात सस्पेन्स, थ्रिल कसे येईल यावर अधिक भर दिल्याने हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. श्री. गुजराथी यांचा मुंबईच्या जाहिरात क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव त्यासाठी निश्‍चितच उपयोगी पडला, असे म्हणता येईल. हे एखाद्या चित्रपटासाठी लिहिलेले कथानक असावे किंवा येत्या काळात व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग सादर करण्याची निर्मात्यांची मनोकामनाही नाटक पाहताना सहजच लक्षात येते.

गुजराथी यांच्या या प्रयत्नांना प्रशांत महाजन, नाना गुजराथी, सनी धात्रक, निखिल बागूल, दीपक काळे, राहुल गुजराथी, सागर घरटे, गायत्री पाटील, सरिता बच्छाव, रजाक शेख या कलावंतांनी पुरेपुर साथ दिली आहे. विक्रम गवांदे यांचे नेपथ्य आणि संगीत संयोजनही कथानकाला साजेसे आहे. तर, चैतन्य गायधनी यांची प्रकाश योजना व माणिक कानडे यांची रंगभूषाही पात्रांना साजेशी होती. तर ब्ल्यू ओशन एंटरटेनमेंटची निर्मिती सहाय्यता या नाटकाला लाभली आहे.

Actors of Creative Mind Foundation Trust presenting scenes from the play 'Schrödingers' at the Amateur Marathi State Drama Competition.
Success Story | जिद्द : अपंगत्व झुगारून सुरश्रीताईंची उद्योगभरारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com