SAKAL Exclusive : विभागात ग्रंथालयांची संख्या मंदावतेय

libraries
librariesesakal

नाशिक रोड : नाशिक विभागात सध्या ग्रंथालयांची संख्या मंदावते आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांमध्ये केवळ चौदाशे तीन ग्रंथालये कार्यक्षम असून, १८४ ग्रंथालये अकार्यक्षम म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

तुटपुंजे अनुदान आणि व्यावसायिक दृष्टीने ग्रंथालय चळवळीकडे पाहिले जात असल्यामुळे विभागात ग्रंथालयांची संख्या मंदावते आहे. (SAKAL Exclusive number of libraries in Nashik Division slowing down nashik news)

‘ग्रंथ हेच गुरू’ असे ब्रीदवाक्य आपण नेहमीच ऐकतो. पुस्तकांनी माणूस घडतो, ग्रंथालय ही संस्काराची केंद्रे आहेत. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मात्र सध्या ग्रंथालयांची संख्या मंदावते आहे. शासनाने २०१२ नंतर नवीन ग्रंथालयांना अनुदान देणे बंद केले आहे.

अशातच जुन्या ग्रंथालयांची संख्या नाशिक विभागात एक हजार ५८७ आहे. ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ स्तर अशी ग्रंथालयांची विभागणी केली जाते. त्यांना साधारणतः तीस हजारांपासून साडेसात लाखांपर्यंत दर्जानुसार अनुदान दिले जाते.

वास्तविक, ग्रंथालय ही एक सेवा मानली जाते. मात्र, अनेक जण ग्रंथालयांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहतात. त्यामुळे ग्रंथालयांची संख्या सध्या मंदावते आहे. नव्याने तयार होणारी ग्रंथालये स्वखर्चाने ग्रंथ खरेदीबरोबरच वाचन चळवळ वृद्धिंगत करीत आहेत.

मात्र, शासन ज्या ग्रंथालयांना अनुदान देत होते. त्यातील अनेक ग्रंथालये आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ग्रंथालयांची तपासणी केली असता, अनेक त्रुटी आढळल्याचे सहाय्यक ग्रंथालय संचालक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

libraries
Employee Strike : शासनाच्या निर्णयाची होळी; मागे न हटण्याचा निर्धार कायम!

अशी आहे ग्रंथालयांची आकडेवारी

जिल्हा कार्यक्षम अकार्यक्षम एकूण

अहमदनगर ४५६ ५८ ५१४

जळगाव ४०२ ३१ ४३३

धुळे २०१ २१ २२२

नाशिक २५४ ४० २९४

नंदुरबार ९० ३४ १२४

एकूण १४०३ १८३ १५८७

"ग्रंथालयांची संख्या वाढण्यासाठी शासनाने पावले उचलायला हवीत. ग्रंथालय चळवळीकडे व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन म्हणून पाहिले गेले पाहिजे. ग्रंथालयांचे अनुदान वाढवायला पाहिजे. यासाठी केजी टू पीजी, तसेच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पुस्तक वाचनाची चळवळ वृद्धिंगत व्हायला हवी." -मुकुंद आढाव, सभासद, मसाप

libraries
Success Story : शेतकरीपुत्रांना मिळाले 18 लाखांचे पॅकेज..! NMIMSमधून घेतली भरारी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com