SAKAL Exclusive : महिला व बालविकास विभागाने रोखले 130 बालविवाह; नाशिक जिल्ह्यातील चित्र

child marriage
child marriageesakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुलींच्या शिक्षणाविषयी पालकांमध्ये जनजागृती वाढलेली दिसत असली तरी जबाबदारीतून मुक्त होण्याच्या नावाखाली बालविवाहांचे प्रमाण आजही कायम आहे. जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाने गेल्या तीन वर्षात तब्बल १३० बालविवाह करणाऱ्या जोडप्यांना बोहल्यावर चढण्यापासून रोखले आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी समाजात जागृती हळूहळू वाढत आहे. तेव्हा मुलींचे लग्न ठरवताना जरा वयाचाही विचार करा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. (SAKAL Exclusive Women and Child Development Department stopped 130 child marriages at Nashik district news)

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, असे आपण म्हणतो खरे पण, प्रत्येक ठिकाणी हा विचार अजून पोहोचलेला नाही. मुलींच्या जन्माचे स्वागत मोठ्या दिमाखात होते. परंतु, त्यांच्या लग्नाच्या वेळी वयाचा विचार आजही केला जात नाही.

बहुतांश ठिकाणी मुलीच्या वयापेक्षा तिच्या शरीरावरुन किंवा दिसण्यावरून विवाह ठरवला जातो. बालविवाहाचे प्रमाण ग्रामीण भागासह शहरातही फार मोठ्या प्रमाणात आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी समाजात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात जागृती झालेली नाही.

आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळख असलेल्या पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, इगतपुरी या तालुक्यातून वर्षानुवर्षे बालविवाहाची तक्रार येत नाही. पण जास्तीत जास्त बालविवाह या भागात आजही होतात.

आशा विवाहांची चाहूलच लागू दिली जात नाही. तिथपर्यंत पोहोचण्याचे खरे आव्हान महिला व बालविकास विभागासमोर निर्माण झाले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

child marriage
Sanjay Raut on BJP | भाजपच्या पायाखालची जमीन घसरली; शहांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांचे वक्तव्य

...तालुकानिहाय प्राप्त तक्रारी

तालुका...२०२०...२०२१...२०२२

नाशिक...०६...०७...१२

पेठ...००..०२...००

बागलाण...००...०३...०४

मालेगाव...०४...०८...११

चांदवड...०१...०२...०४

इगतपुरी...००...००...०१

त्र्यंबकेश्वर...०३...०२...०३

सिन्नर...०२...०७...०३

दिंडोरी...००...०२...०४

निफाड...०१...०५...०७

येवला...०१...०५...०९

देवळा...०२...०१...०१

कळवण...००...००...००

नांदगाव...०१...००...०४

सुरगाणा...००...००...००

एकूण...२१...४५...६४

child marriage
Life in Balance : कष्टाला येतोय फुलांचा सुगंध...; हार निर्मितीतून शेकडो महिलांना मिळतोय आर्थिक आधार

बालविवाहाची प्रमुख कारणे

- बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी समाजात जनजागृतीचा अभाव

- मुलीचा पाय 'वाकडा' पडण्यापूर्वीच तिचे लग्न लावून देण्याची मानसिकता

- सामाजिक प्रतिष्ठा जोपासण्यासाठी मुलीच्या लग्नाचा विचार

- जबाबदारीतून लवकर मुक्त होण्याची आई,वडिलांची मानसिकता

- आदिवासी भागातून एकही तक्रार या विभागाकडे प्राप्त झालेली नाही

- बालविवाह असल्याची माहितीच समजू दिली जात नाही, असे विवाह गुपचूप उरकले जातात

"आमच्या विभागाकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही तातडीने लग्न थांबवतो. संबंधित गावातील ग्रामसेवक, पोलीसांना सोबत ही कारवाई होते. समाजात या कायद्याविषयी जनजागृती झाल्यास बालविवाहाचे प्रमाण अजून कमी होण्यास मदत होईल."

- अजय फडोळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नाशिक

...येथे करा तक्रार

बालविवाह होत असल्याचे समजल्यास त्याविषयी तक्रार नोंदवण्यासाठी या विभागाने १०९८ हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. विवाह ठरल्यापासून साधारणत: दोन वर्षापर्यंत आपल्याला तक्रार नोंदवता येते.

तसेच संबंधित गावातील ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक समितीचा प्रमुख असतो. त्यामुळे आपल्या हद्दीत बालविवाह होणार नाही,याची दक्षता ग्रामसेवकांना घ्यावी लागते.

child marriage
Valentines Day 2023 : तुझ्या- माझ्या प्रेमाचं नातं आयुष्यभर असंच रहावं! शहरात व्हॅलेंटाइन डे’चा फिवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com