SAKAL Impact : नाईक शाळा परिसरातील रस्त्याचे काम सुरू

Road work started in Kathada Suman Naik school area
Road work started in Kathada Suman Naik school areaesakal

जुने नाशिक : कठडा सुमन नाईक शाळा परिसरातील रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसापासून बंद होते. मंगळवारी (ता. १८) याबाबत ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दखल घेत त्वरित कामास सुरवात करण्यात आली आहे. कठडा सुमन नाईक शाळा समोरील चार महिन्यापूर्वी काँक्रिटीकरणाचा तयार करण्यात आलेला रस्ता खचून ट्रकचा अपघात घडला होता. (SAKAL Impact Road work started in Naik school area after nashik Latest Marathi News)

Road work started in Kathada Suman Naik school area
Chhagan Bhujbal :...अन् 2200 रुपये 1 वार, 2 वार म्हणत भुजबळांनी केला मक्याचा लिलाव

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. रस्त्याचे काम दिवाळीपूर्वी करण्याच्या आदेश दिले होते. त्यानंतर कामास सुरवात करण्यात आली. खडी, माती टाकून रस्ता तयार करण्याचे काही दिवस काम सुरू होते. त्यानंतर मात्र काम बंद करण्यात आले. अर्धवट रस्ता तयार करून काम बंद केल्याने तो रस्ता आणि रस्त्या खालून गेलेल्या ड्रेनेज पाइपलाइनचा खड्डा अपघातास निमंत्रण देत होता.

नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. पंधरा दिवसांपासून काम बंद असल्याने परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी दखल घेत त्वरित रस्त्याच्या कामास सुरवात केली आहे. मंगळवारी अपघातास निमंत्रण देणाऱ्या खड्ड्यांचे काम प्रथमतः हाती घेण्यात आले.

त्या ठिकाणी चेंबर बनवून सांडपाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतर लगेचच रस्त्याचे काम केले जाणार आहे. पुन्हा एकदा रस्त्याचे काम सुरू झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु काम पुन्हा बंद करू नये, तसेच पूर्वीप्रमाणे निकृष्ट रस्ता न तयार करता उत्कृष्ट प्रतीचा रस्ता तयार करण्यात यावा. जेणेकरून पुन्हा अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशी मागणी रहिवाशांनी केली.

Road work started in Kathada Suman Naik school area
Nashik : एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडणार; भुसावळ-इगतपुरी मेमूही 2 दिवसांसाठी रद्द

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com