Latest Chhagan Bhujbal News |...अन् 2200 रुपये 1 वार, 2 वार म्हणत भुजबळांनी केला मक्याचा लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal During Auction

Chhagan Bhujbal :...अन् 2200 रुपये 1 वार, 2 वार म्हणत भुजबळांनी केला मक्याचा लिलाव

येवला (जि. नाशिक) : चला बोला... सोन्यासारखा पिवळा धमक माल आहे... २२०० रुपये एक वार,दोन वार अन तीन वार..अशी बोली लावत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज अंदरसुल येथील मका लिलावात भाग घेत बोली लावली...निमित्त होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येथील उप बाजारात मका खरेदीच्या शुभारंभाचे....(Chhagan Bhujbal auctioned maize at yeola agricultural market committee Nashik Latest News)

शेतकऱ्यांना आपला पिकवलेला शेतमाल विक्री करण्यासाठी बाजारपेठांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समिती अंदरसुल उपबाजार येथे मका व भुसार मालाच्या लिलावास शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी स्वतः शेतमालाच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला..

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात ६० टक्क्यांहून अधिक लोक शेती करत आहे. देशात कृषी क्षेत्रात शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठी क्रांती झाली. त्यातून देश मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मार्केट उपलब्ध होण्यासाठी मार्केटच विकेंद्रीकरण करणे अतिशय महत्वाचे असून तालुक्यात उपबाजार सुरू करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Diwali Festival: आयात घटल्याने फटाके दरांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ; मागणीदेखील वाढणार

ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. अद्याप मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच भविष्यात आपल्या हिताची जोपासना करणारे कोण आहे याबाबत आपला निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यात अनेक कामांना स्थगिती देण्यात आलेली होती. त्यापैकी अद्यापही अनेक कामांची स्थगिती कायम आहे. त्यामुळे विकासाची कामे रखडली आहे. त्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र सर्व कामे आपण पूर्ण करू असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: Nashik : अबब! शंकराच्या मूर्तीवर अवतरले चक्क नागराज