Sakal Petopia
sakal
नाशिक: झुपकेदार शेपटीची पर्शियन मांजर, तिचे म्यॅव म्यॅव करत किलबिल्या नजरेने चिमुकल्यांकडे पाहणे, त्याचबरोबर श्वानांचे रुबाबदार प्रात्यक्षिके, त्यांचे पायात घुटमळणे, मुलांना बघून उड्या मारणे, तर दुसरीकडे माशांची रंगबिरंगी दुनिया आणि नानाविध पक्ष्यांचा किलबिलाटाने ‘सकाळ-पेटोपिया’ कार्निव्हलचे शनिवारी (ता. १५) सकाळी हनुमानवाडी रोडजवळील श्रद्धा लॉन्स येथे थाटात उद्घाटन झाले. या उपक्रमासाठी दीपक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स, झेनो हेल्थ व श्रद्धा लॉन्स यांचे सहकार्य लाभले.