SAKAL Special : गायरानावरील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचे मौन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Land

SAKAL Special : गायरानावरील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचे मौन!

नाशिक : गावठाणातील अतिक्रमण असलेल्या जिल्ह्यातील ८ हजार २३० जागा अतिक्रमणधारकांच्या नावावर करण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे मात्र गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या न्यायालयीन सक्तीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गायरानावरील ४ हजार ७८७ अतिक्रमण काढायची आहे. एकाचवेळी गावठाण अतिक्रमण कायम करायची, तर गायरानावरील काढायची अशा परस्पर विरोधी भूमिका वठविताना प्रशासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत मौन साधले आहे. (SAKAL Special bAdministration silence regarding encroachments on Gairan Nashik News)

नाशिक जिल्ह्यात साधारण ११ हजार २७३ हेक्टर गायरान क्षेत्र आहे. साधारण १६१ हेक्टर क्षेत्रावर ४ हजार ४८७ बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत. त्र्यंबकेश्वरला गायरान जमिनीवर शैक्षणिक संस्थाची चर्चा असली तरी अनेक जमिनी स्थानिक ग्रामपंचायत आणि सरकारने संस्थांना दिल्याने सरकारी दप्तरी मात्र त्र्यंबकेश्वर, मालेगाव, बागलाण, देवळा आणि पेठ या पाच तालुक्यात एकही अतिक्रमण नसल्याची नोंद आहे.

अतिक्रमण निर्मूलन कधी?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील गायरानावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश आहेत. गायरानावरील अतिक्रमणांची संख्या ४ हजार ७८७ इतकी आहे. एवढ्या व्यापक स्वरुपात गायरानाच्या जमिनीवर अतिक्रमण असले तरी, महसूल यंत्रणा मात्र अद्यापही त्याबाबत संथ व मौनात आहे. अद्यापपर्यत जिल्हास्तरावरील एकाही अधिकाऱ्यांनी जाहीररित्या अवाक्षर काढलेले नाही. गायरान अतिक्रमण काढण्यासाठी लोकप्रतिनिधी विरोध घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. प्रशासनाला त्यात रस नाही. त्यामुळे गायरान जमिनीबाबत न्यायालयीन आदेश केवळ कागदोपत्री आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : बदलत्या वातावरणामुळे शेतकरी त्रस्त!

२ हजार ८२० प्रकरणे नाकारली

राज्यात गावठाणावरील तसेच भूमिहिन नागरिकांची अतिक्रमण कायम करत त्यांना जागेचे मालक करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्याची अंमलबजावणी सुरु आहे. ग्रामसभाकडून तसे ठराव पाठवले आहेत. त्यासाठी गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर विविध समिती नेमल्या आहेत. त्यात दिवसागणिक आकडेवारीत बदल होतो आहे.

२ हजार ८८७ प्रकरणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत. ५ हजार ४१० प्रस्ताव संगणकावर नामंजूर दाखवले जात आहेत. गावठाण अतिक्रमणाबाबत २९० ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडे ५ हजार ४१० प्रस्ताव आहेत. २ हजार ८२० ग्रामसभेने नाकारले असून त्यातील अनेक प्रस्ताव तालुकास्तरीय शक्तीदत्त समितीकडे पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : डॉ. पवारांवर हल्ला करणारे संशयित अद्यापही मोकाटच!

जिल्ह्यातील अतिक्रमणांची स्थिती

तालुका अतिक्रमणांची संख्या अतिक्रमित क्षेत्र (हेक्टर) गावठाणावरील अतिक्रमण

नाशिक ८७३ १५.८९ हेक्टर २७९

चांदवड १३३१ ३१.७५ ५०८

कळवण ६१८ २३.३२ ३६३

सिन्नर ५५५ ११.०४ १८४३

दिंडोरी ५१९ १५.७४ १६६

नांदगाव ५४१ २१.१२ ५७३

येवला २१ ४१.१५ २९१

सुरगाणा १२ ००.०१ ००

निफाड ०९ ०१.१८ ८८४

इगतपुरी ०८ ००.१ २८

मालेगाव ---- --------- २६९२

त्र्यंबकेश्वर ००० ००० १२

बागलाण ०० ०० ६०५

देवळा ०० ०० ५३

एकुण ४ हजार ४८७ १६१.३९ ८ हजार २९७

हेही वाचा: Nashik ZP News : सुरगाण्याच्या मूलभूत सुविधांसाठी झेडपीचा Action Plan!

टॅग्स :NashikLandsEncroached