Sakal Special : चालता...बोलता...! मीच आहे हुशार...

लहान मुले म्हटले, की ते कधी काय बोलतील अन काय नाही, हे सांगताच येत नाही. सीनिअर केजीच्या वर्गात चिमुरडा शिकतो.
school
school esakal
Updated on

मीच आहे हुशार...

लहान मुले म्हटले, की ते कधी काय बोलतील अन काय नाही, हे सांगताच येत नाही. सीनिअर केजीच्या वर्गात चिमुरडा शिकतो. शाळेतून त्याला पाढे पाठ करण्यास सांगितले होते. पालकांनी रात्री त्याच्याकडून पाढा पाठ करून घेतला. दुसऱ्या दिवशी तो शाळेतून परत आला.

पालकांना त्याने शाळेत पाढा कसा म्हटला असेल, याची उत्सुकता होती. चिमुकला शाळेतून आला आणि पालकांनी त्यास शाळेत पाढा कसा म्हटला विचारले. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता त्याला कोणता पाढा पालक विचारत आहेत, हे दिसून आले.

पालक एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. अखेर पालकाने विचारले, ‘अरे तू शाळेत काय म्हटला मग? वर्गात कोण हुशार आहे की नाही?’ यावर त्या चिमुकल्याने पालकांच्या चेहऱ्याकडे कटाक्ष टाकला आणि काही क्षण विचार केला.

माझ्या क्लासमध्ये मीच तर हुशार आहे, असे छातीठोकपणे म्हणाला. त्याचे ते बोलणे एकूण पालकांनी डोक्यालाच हात मारून घेतला.

(Sakal Special chalta bolta I am smart in nashik news)

school
Sakal Special : चालता...बोलता...! संजय राऊतांनी धरली राष्ट्रवादीची वाट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

how to handle child tantrums?
'Dhing Tang' humorously takes on selective political memory through the witty conversation between Adubal and Amubal, blending satire with contemporary politics.
Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
Fridship day special article in marathi
Marathi News Esakal
www.esakal.com