SAKAL Special : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रामतीर्थच्या सौंदर्यास बाधा!

Ramtirtha
Ramtirthaesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : प्रभू श्रीराम चंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत भक्त- भाविकांना अचूक वेळ दाखवणारं ऐतिहासिक घड्याळ आणि गोदावरीचं सौंदर्य खुलवणारा वॉटर कर्टन, तसेच गोमुखातून येणार पाणी असे रामतीर्थ परिसरातले तिनही आकर्षण गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. या परिसरातील भिकारी, अस्वच्छता आणि समस्या पाहता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रामतीर्थावरील सौंदर्यास बाधा निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. (SAKAL Special Due to neglect of administration beauty of Ramtirtha disturbed nashik news)

कोरोना काळात निर्बंधांमुळे धार्मिक स्थळ व पर्यटन क्षेत्रांवरही बंदी घालण्यात आली होती. निर्बंध हटल्याने सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. नाताळाच्या सुट्ट्या असल्याने देशभरातून नव्हे, तर जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी नाशिकमध्ये येत आहेत.

पंचवटीतील गोदाघाट, रामतीर्थ येथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. त्यामुळे या स्थळाला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. रोज अस्थीविसर्जन व कर्मकांडासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. रामतीर्थावर आल्यानंतर प्रत्येक भाविक आपल्या घरी गोदावरी नदीचे पाणी तीर्थ म्हणून घेऊन जात असतो.

परंतु सहा ते सात महिन्यांपासून गोमुखाचे पाणी बंद असल्याने भाविकांच्या पदरी निराशा पडत आहे. काही वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थिती पाहता गोदावरी रामतीर्थ येथे काही वर्षांपूर्वी महिलांसाठी उभारण्यात आलेल्या वस्त्रांतर गृहावर एक मोठे घड्याळ एका व्यावसायिकाच्या माध्यमातून बसविण्यात आले होते.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Ramtirtha
Nashik Crime News : डॉ. पवार यांच्या हत्त्येचाच होता कट! 16 दिवसांनी गुन्ह्याची उकल

त्यांनीच अनेक वर्षे घड्याळाची देखभाल दुरुस्ती केली. त्यानंतर ते घड्याळ पालिकेकडे हस्तांतरित केले होते. मात्र, आता पालिकेच्या हलगर्जीपणामुळे त्या घड्याळाची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने आलेल्या पर्यटकांना बंद घड्याळ्याचे दर्शन घडते आहे.

आकर्षक वॉटर कर्टन बंद

मनसेच्या सत्ताकाळात पर्यटक व भाविकांना गंगाघाटावर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून अहिल्याबाई होळकर पुलावरून गांधी तलावात आकर्षक वॉटर कर्टन उभारण्यात आला होता.परंतु, पालिकेतील सत्तांतरानंतर तोही बंद पडला. आजतागायत चालू करण्यात आला नाही.गोदासंवर्धनाच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी सुरू असताना याकडे मात्र डोळेझाक होते आहे.

Ramtirtha
Nashik Crime News : इगतपुरी येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com