SAKAL Special: पहिल्या दिवशी मिळणार एक गणवेश; मोफत गणवेशासाठी साडेसात कोटींचा निधी वर्ग

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal

SAKAL Special : राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या घोळामुळे गणवेशाचा निधी मिळण्यास जून उजाडला आहे. जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी साडेसात कोटींचा निधी गटस्तरावर बुधवारी (ता.७) शिक्षण विभागाकडून वर्ग झाला आहे.

त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळणार असून दुसऱ्या गणवेशासाठी मात्र, विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. (SAKAL Special One uniform will be given on first day seven half crore fund category for free uniforms nashik news)

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जात होते. साधारण एप्रिल-मे महिन्यात शाळा व्यवस्थापन समितीकडून हे गणवेश खरेदी केले जात. इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा म्हणून शाळांकडून इंग्रजी मिडीयमच्याधर्तीवर गणवेश दिले जात होते.

त्यामुळे जिल्हा परिषदांच्या एका गावातील शाळांमध्ये एक गणवेश तर, दुसऱ्या गावातील शाळेचा दुसरा गणवेश दिसत होता. दरवर्षींची प्रकिया म्हणून जिल्ह्यामधील बहुतांश शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेशांची मे महिन्यात खरेदी करून ठेवली.

परंतु, यंदा शासनाने जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांसाठी एकच गणवेश ते देखील राज्य शासनाकडून अन सर्वच विद्यार्थ्यांना देण्याची घोषणा झाली. मात्र, शाळांमधील समित्यांनी गणवेश खरेदी केलेली असल्याने हा खर्च मुख्याध्यापकांच्या माथी पडणार म्हणून त्यांनी शासन दरबारी ओरड केली.

ही ओरड झाल्यानंतर एक गणवेश शालेय समितीकडून तर, दुसरा गणवेश राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय झाला. यंदा पहिले ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार आहे.

यापैकी एक गणवेश पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडून दिला जाणार असल्याने त्यांचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे. एका गणवेशाची किंमत ३०० रुपये इतकी असणार आहे.

अनेकांनी शाळांना गणवेश खरेदी केला आहे. तर, काही शाळांना निधी मिळाल्यानंतर गणवेश खरेदीची कारवाई करण्याची तयारी करावी लागणार आहे.

ZP Nashik latest marathi news
Maharashtra Politics: "अजित पवार लोकं तुम्हाला जोड्याने मारतील", पडळकरांची जहरी टीका

सर्वच विद्यार्थ्यांना यंदा मोफत गणवेश

पूर्वी शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळत होता. या वर्षापासून शासनाने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे राज्य शासनाने शाळा व विद्यार्थी यांची संख्या मागविली होती.

त्यानुसार प्राथमिक विभागाने ३१ मे रोजी गणवेश मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. या प्रस्तावानुसार शाळांमधील एकूण २ लाख ४७ हजार ६३५ विद्यार्थ्यांना ७ कोटी ४२ लाख ९० हजार ५०० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी तालुका गटशिक्षणाधिकार्यांकडे वर्ग झाला आहे.

दुसऱ्या गणवेशाचा प्रतिक्षा

शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे गणवेशाचा निधी मिळण्यास जून महिना उजाडला आहे. शाळा सुरू होण्यास आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना निधी प्राप्त झाला आहे.

यामुळे पहिल्या दिवशी गणवेश मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. एक गणवेश मिळाला असला तरी, राज्य शासनाकडून दुसरा गणवेश कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP Nashik latest marathi news
Shashikant Shinde यांची शिंदे फडणवीस सरकारवर झणझणीत टीका | NCP | BJP | Maharashtra Politics

तालुकानिहाय विद्यार्थी व निधी

तालुका एकूण विद्यार्थी एकूण अनुदान

बागलाण १९ हजार ७८५ ५९ लाख ३५ हजार ५००
चांदवड ११ हजार ४८३ ३४ लाख ४४ हजार ९००
देवळा ६ हजार ९७३ २० लाख ९१ हजार ९००

दिंडोरी २४ हजार ३६७ ७३ लाख १० हजार १००

इगतपुरी २० हजार १०३ ६० लाख ३० हजार ९००
कळवण १३ हजार ४७० ४० लाख ४१ हजार
मालेगाव २४ हजार ४८५ ७३ लाख ४५ हजार ५००
नांदगाव १५ हजार ६६३ ४६ लाख ९८ हजार ९००
नाशिक १३ हजार ७२५ ४१ लाख १७ हजार ५००
निफाड २२ हजार २२३ ६६ लाख ६६ हजार ९००
पेठ १३ हजार४९२ ४० लाख ४७ हजार ६००
सिन्नर १४ हजार ७५१ ४४ लाख २५ हजार ३००
सुरगाणा १७ हजार ६४ ५१ लाख १९ हजार २००
त्र्यंबकेश्वर १६ हजार ६५८ ४९ लाख ५८ हजार ४००
येवला १३ हजार ५२३ ४० लाख ५६ हजार ९००

ZP Nashik latest marathi news
Politics: विखें विरोधात थोरात-कोल्हे एकत्र; 'या' अटीतटीच्या निवडणुकीत विखेंची प्रतिष्ठा पणाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com