SAKAL Special: पार्किंग समस्या हिंसेच्या मार्गावर! महापालिका, स्मार्टसिटी यंत्रणा ढीम्म

पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज
Crowd scene on Mahatma Gandhi Road
Crowd scene on Mahatma Gandhi Roadesakal
Updated on

SAKAL Special : शहरातील मुख्य बाजारपेठेतील कायम गजबजलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर वांरवार वाहतूक ठप्प होत असल्याने वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याने व्यापारी व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला.

यानिमित्ताने खराब रस्ते, आरोग्य, वाहतूक या समस्येप्रमाणेच पार्किंगची समस्या तीव्र असल्याचे समोर आले. आता ही समस्या हिंसक वळणावर आल्याने महापालिका, स्मार्टसिटी प्रशासनाला दखल घेऊन पार्किंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. (SAKAL Special Parking problems Municipal Corporation Smart City System slow nashik)

दुकानापुढील अनधिकृत प्रशस्त ओटे
दुकानापुढील अनधिकृत प्रशस्त ओटेesakal
व्यापारी संकुलाचे तळमजल्यातील साठलेला कचरा.
व्यापारी संकुलाचे तळमजल्यातील साठलेला कचरा.esakal

शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सुविधांचे जाळे अधिक विस्तारण्याची आवश्‍यकता आहे. महापालिका किंवा स्मार्टसिटी कंपनीकडून रस्ते, पाणी, आरोग्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, दिवाबत्ती, उड्डाणपूल या पायाभूत सुविधांवरच भर दिला जातो.

परंतु त्या व्यतिरिक्त अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात पार्किंगची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. प्रत्येक व्यक्तीकडे जसा मोबाईल त्याप्रमाणे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असतेच, परंतु ती वाहने सार्वजनिक ठिकाणी लावण्याची व्यवस्था उपलब्ध नाही.

रस्त्यावर वाहने सर्रास लावली जात असल्याने त्यातून वाहतूक ठप्प होणे, वेळ वाया जाणे, प्रदूषण, मनस्ताप, ताणतणाव या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने पार्किंगची व्यवस्था लावली नाही तर पार्किंग समस्येवरून दंगली झाल्यास विशेष वाटण्याचे कारण नाही.

अनधिकृत पार्किंगची ठिकाणे

- मुंबई नाका परिसर.

- ठक्कर बाजार रस्ता.

- अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दुतर्फा रस्ता.

- मल्हारखान, पशुवैद्यकीय दवाखाना.

- उड्डाणपुलाखाली.

- सारडा सर्कल ते मुंबई नाका.

व्यापारी संकुलाचे तळमजल्यातील साठलेला कचरा.
व्यापारी संकुलाचे तळमजल्यातील साठलेला कचरा.esakal
Crowd scene on Mahatma Gandhi Road
Nashik Crime Rate: शहरातील अवैध धंद्यांना बसेना आळा; 6 महिन्यात पावणेतीनशे गुन्हे! 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्मार्ट पार्किंगला मान्यता

शहरात २८ ठिकाणी रस्त्याच्या कडेला (ऑन रोड), तर पाच ठिकाणी जागा निश्चित करून (ऑफ रोड) पे ॲन्ड पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाइन पार्किंगसाठी मार्किंग करण्यात आले, परंतु कोविडमुळे पार्किंगचा ठेका घेतलेल्या कंपनीने दर वाढवून मागितल्याने वाद निर्माण झाला व आता प्रकल्पच रद्द झाला.

यशवंत मंडई पार्किंग

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर यशवंत मंडई येथे २१२ तर सिता गुंफा येथील जागेवर २५२ कारसाठी बहुमजली व यांत्रिकी पार्किंग उभारण्याचा निर्णय स्मार्टसिटी कंपनीने घेतला.

स्मार्ट पार्किंगसाठी ट्रायजिन व इन्स्पिरिया कंपन्यांच्या निविदांना मान्यता दिली, परंतु पुढे प्रकल्प गुंडाळण्यात आला.

शिवाजी स्टेडिअममध्ये पार्किंग

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर भूमिगत पार्किंगचा पर्याय समोर आला.

६८२ चारचाकी वाहने बसतील असे नियोजन करण्यात आले. परंतु उच्च न्यायालयाने खेळण्यासाठी मैदान राखीव ठेवण्याचे आदेश दिले असल्याने तसेच जिल्हा परिषदेने जागा देण्यास विरोध केल्यानंतर पार्किंगचा प्रश्न कायम राहिला.

सर्वसमावेशक आरक्षणाचा घोळ

समावेशक आरक्षणाच्या नावाखाली पार्किंगच्या मोक्‍याच्या जागा विकसित केल्या. परंतु विकसित केलेल्या इमारतींसह पार्किंगची जागादेखील अद्यापही महापालिकेच्या ताब्यात मिळाल्या नाहीत. देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक १२२ चे शॉपिंग क्षेत्र पार्किंगसाठी विकसित झाले.

नाशिक शिवारातील सर्वे क्रमांक ४३२ मधील क्षेत्राचे बांधकाम अपूर्ण आहे. टीपी स्कीम दोनमधील सर्वे क्रमांक ९९९, १००० मध्ये सहाशे चौरस मीटर जागेवर पार्किंग विकसित झाले, परंतु महापालिकेकडे हस्तांतरित झाले नाही.

मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलच्या जागेवर चार हजार चौरस मीटर जागेवर भूमिगत वाहनतळ उभारले, परंतु तरीही वाहने तेथे पार्क न होता मुंबई नाका भागात होतात. पंचवटी गावठाणात सिता गुंफा येथे १२९० चौरस मीटर वाहनतळ विकसित झाले.

परंतु महापालिकेने त्या वाहनतळाचा वापर केला नाही. पंचवटी गावठाणातील सीटीएस क्रमांक ५८७७ मध्ये पार्किंगसाठी इमारत तयार आहे. परंतु त्याचा वापर पार्किंगसाठी होत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crowd scene on Mahatma Gandhi Road
Gurumauli Annasaheb More: आध्यात्मिक सेवेतून राष्ट्रविकास साधा : गुरुमाउली

पार्किंगचा निधी गोल्फ क्लब विकासासाठी

महापालिकेकडून शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये १० कोटी रुपये खर्चून १० ठिकाणी यांत्रिक पार्किंग उभ्या केल्या जाणार होत्या. त्यासाठी राज्य सरकारने पाच कोटी आणि महापालिकेने पाच कोटींचा निधी दिला.

या कामांसाठी महापालिकेने तीनदा निविदाही काढल्या. परंतु या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पडून असलेला निधी गोल्फ क्लबच्या कामांसाठी वळविण्यात आला.

मॉलमध्ये मोफत पार्किंग

पुणे महापालिकेच्या शहर सुधार समितीच्या एका निर्णयाचा आधार घेऊन पुणे शहरातील सर्व मॉल्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा ठराव करण्यात आला. नाशिक महापालिका प्रशासनाने शहरातील मॉलमध्ये मोफत पार्किंगचा निर्णय घेतला.

नोटिसा पाठविल्यानंतर मात्र सिटी सेंटर मॉल प्रशासनाने महापालिकेलाच उलट नोटीस देत कुठल्या अधिकाराखाली कारवाई केली, याचे उत्तर मागितल्याने प्रशासन अडचणीत सापडले होते.

धमकीचे अस्त्र

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहणारे नागरिकांसाठी पार्किंगची समस्या तीव्र आहे. निवासी व व्यावसायिक भाग एकच असल्याने घरासमोर वाहने लावून कामानिमित्त जातात. त्यामुळे मुळ मालकांना स्वतःची वाहने लावण्यास जागा मिळत नाही.

तर प्रवेशद्वारासमोरच वाहने लावली जात असल्याने ये-जा करता येत नाही. यातून परिस्थिती चिघळत असून वादावादी, हाणामाऱ्यांचे प्रकार वाढले आहे. त्यातून दारासमोर अक्षरक्ष धमक्यांचे फलक मालकांकडून लावले जात असल्याने पार्किंग वरून होणारे वाद हिंसक होत चालले आहेत.

Crowd scene on Mahatma Gandhi Road
Nashik News: ग्रामीणच्या आमदारांची शहरी भागात ढवळाढवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com