SAKAL Impact News : शिक्षकांचे वेतन बँकेकडून तत्काळ जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salary

SAKAL Impact News : शिक्षकांचे वेतन बँकेकडून तत्काळ जमा

जुनी शेमळी (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील सुमारे एक हजार प्राथमिक शिक्षकांचे वेळेवर वेतन बँकेच्या ढिसाळ नियोजन अभावी रेंगाळत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ मधून प्रसिद्ध होताच संबंधित बँक अधिकारी व कर्मचारी यांनी या वृत्ताची दखल घेत तालुक्यातील सर्व शिक्षकांचे वेतन दुसऱ्याच दिवशी सकाळी खात्यावर अदा केले. (salary of one thousand primary teachers of Baglan taluka deposited in bank account in morning sakal impact news)

तालुक्यात एक हजार शिक्षक कार्यरत आहेत वेतनाचा धनादेश हा इतर तालुक्यात पंचायत समिती कडून बँकेत धनादेश जमा केल्यानंतर तत्काळ तो वटला जाऊन शिक्षकांच्या खात्यावर एकच दिवसात वेतन अदा होते.

मात्र बागलाण तालुका पंचायत समितीकडून धनादेश वेळेवर बँकेत अदा होऊन वेतनासाठी येथे प्रत्येक महिन्यात शिक्षकांना दोन दिवसाचा विलंब होत होता. प्रत्येक महिन्यात असा अनुभव येत असल्याने शिक्षकांमध्ये बँकेच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त केला जात होता.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik Graduate Constituency : आमदार तांबेंचा जनसंपर्कच सत्यजित यांना तारून नेणार!

नववर्षाच्या पहिल्या सणाच्या वेळेस देखील शिक्षकांचे वेतन हे केवळ बँकेमुळे झाले नव्हते. त्यामुळे शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अखेर याप्रश्‍नी आवाज उठविला. त्यानंतर अवघ्या एका दिवसात बँकेने शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा केले.

"तालुक्यात शिक्षकांचे वेतन बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे एक दिवसात जमा होत नाही. पंचायत समितीकडून बँकेस धनादेश अदा केल्यानंतरही वेतनास दोन दिवसाचा अवधी लागतो. त्यामुळे नाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे बँकेने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे"

- नीलेश पाटील, तालुकाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना बागलाण

हेही वाचा: Nashik News : वाहतूक कोंडीचा वाद आता न्यायालयात? कंपन्यांना कायदेशीर नोटीस

टॅग्स :Nashiksakal impact news