Nashik Crime: घातक नायलॉन मांजाची विक्री; 36 हजारांचा मांजा जप्त, दोघांवर गुन्हे दाखल

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नायलॉन मांजाची विक्री व वापरांवर बंदी असताना, त्याची सर्रास विक्री होते आहे
manja crime
manja crimeesakal

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नायलॉन मांजाची विक्री व वापरांवर बंदी असताना, त्याची सर्रास विक्री होते आहे.

अंबडच्या हद्दीतून २८ हजारांचा तर, नाशिकरोडच्या हद्दीतून ८ हजारांचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात येऊन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sale of Dangerous Nylon Manja Manja worth 36 thousand seized two arrested Nashik Crime)

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवल पार्क परिसरामध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार अंबडच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) रात्री सात वाजता अमृतेश्वर महादेव मंदिराजवळ संशयित प्रथमेश ज्ञानेश्वर काळे (२१, रा. लक्ष्मण टाऊनशिप रो हाऊस, केवल पार्क) यास बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करताना पकडले.

त्याच्याकडून २८ हजार रुपयांचा नायलॉन मांजाचे ७० गट्टू जप्त केले आहेत. पोलीस अंमलदार तुषार मते यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

manja crime
Nashik Crime: शहरात घरफोड्यांचे सत्र; 4 घटनांमध्ये 7 लाखांचा ऐवज चोरीला

तर, जेलरोड परिसरातील सैलानी बाबाजवळ चरणदास मार्केटसमोर नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याचे समजताच नाशिकरोड पोलिसांनी मेहूल महेश उगरेजिया (१९, रा. परिक्षीत सोसायटी, ओमनगर, जेलरोड) यास नायलॉन मांजा विक्री करताना पकडले.

त्याच्याकडून ८ हजार ८०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अंमलदार कल्पेश जाधव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

manja crime
Nashik Crime: अवघ्या 8 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधम संशयिताला पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com