Nashik Fraud Crime : सेल्स एक्झिक्युटिव्हने लावला कंपनीला 5 लाखांना चुना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

Nashik Fraud Crime : सेल्स एक्झिक्युटिव्हने लावला कंपनीला 5 लाखांना चुना!

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कंपनीतील सेल्स एक्झिक्युटिव्हने कंपनीच्या ऑर्डरसाठी अनेकांकडून ॲडव्हान्समध्ये घेतलेल्या सुमारे पाच लाख रुपयांच्या रकमा कंपनीत न भरता अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संशयित सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रितेश सुरेशराव देशमुख (३५) याच्याविरोधात सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (sales executive cheated company for 5 lakhs Nashik Fraud Crime news)

याप्रकरणी सचीन सुरेंद्र शर्मा (रा. महात्मा नगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीत सुप्रिम इक्युपमेंट प्रा.लि. या नावाची कंपनी आहे. या कंपनीत संशयित प्रितेश देशमुख हा सेल्स एक्झीक्युटीव्ह यापदावर नोकरीला होता.

२९ ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संशयित देशमुख याने कंपनीच्या व्यवहारातून नवनाथ आव्हाड यांच्याकडून तीन लाख २३ हजार रुपये, सिद्दीक खान अजीम खान यांच्याकडून ४० हजार ३००, सईद पटेल यांच्याकडून १८ हजार २०० रुपये, प्रकाश नाना वीर (कराड) यांच्याकडून ५० हजार ४२९ रुपये तर, नवनाथ आव्हाड यांच्या नावे बील तयार करून ५२ हजार ६०० रुपये असे एकूण ५ लाख ९ हजार ९०४ रुपयांची रक्कम घेतली.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Jalgaon Crime News : बंद दुकानातून 59 मोबाईल लंपास; 2 संशयित ताब्यात

मात्र हे पैसे कंपनीच्या खात्यात जमा न करता प्रितेशने स्वत:जवळच ठेवले. त्यानंतर पैशांचा वापर स्वत:साठी करीत कंपनीचे आर्थिक नुकसान केले. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी सातपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित प्रितेश देशमुख याचा पोलिस तपास करीत असून त्याचा पत्ता नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

त्याने कंपनीत भाडेतत्वावर राहत असलेला पत्ता दिला होता, मात्र तेथे तो राहत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime News : विवाहिता, मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल