Professionals frying chicken on Kusumba Street
Professionals frying chicken on Kusumba Street esakal

Nashik News: स्वस्ताईमुळे चिकन टिक्क्याची खवय्यांना भुरळ; विक्रीत दुप्पटीने वाढ

Nashik News: शहरातील पूर्व भागात ‘नॉनव्हेज' खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इथे चिकनचे शेकडो प्रकार बनवले जातात. अशातच, चिकन स्वस्त झाल्याने चिकन टिक्क्याने खवय्यांना भुरळ घातली आहे. तळून मिळणारा टिक्क्याच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली. दररोज सुमारे १७ ते १८ टन चिकनची विक्री होत आहे.

हॉटेल आणि हातगाड्यांवर चिकनचे विविध लज्जतदार पदार्थ बनवून मिळतात. चिकन टिक्का दोनशे रुपयात एक किलो तळून मिळतो. (Sales of chicken tikka doubled nashik news)

चिकनच्या विक्री व्यवसायात स्पर्धा आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत इथे चिकन स्वस्त मिळते. टिक्का विक्रीची सुमारे दीडशे दुकाने आहेत. दशकापासून चिकन टिक्क्याची ‘क्रेझ' वाढली आहे.

चिकनमध्ये ‘बोनलेस' या टिक्क्याला मागणी असते. पिवळा व नारंगी असे विविध प्रकारचे टिक्का तयार करून विक्री होते. नारंगी रंगाच्या टिक्क्याला मागणी अधिक आहे. कुसुंबारोड, आग्रा रोड, जामेतुस्वालेहा, गुलशेरनगर रोड यासह विविध भागांमध्ये चिकन टिक्क्याची दुकाने लावली जातात. चिकन स्वस्त असल्याने अनेक कुटुंबीय चिकन टिक्क्याचा आनंद घेतात. सध्या एका दुकानावर सुमारे पन्नास किलो टिक्क्याची विक्री होते. शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिक चिकन टिक्क्याला पसंती देतात.

Professionals frying chicken on Kusumba Street
Sakal Exclusive: राज्यात 1 कोटी रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे' अभियान

चिकनचे प्रकार

चिकन टिक्क्याबरोबरच हॉटेलमध्ये अनेक पदार्थ बनवले जातात. चिकन रोस्ट, चिकन तंदुरी, चिकन अफगाणी, चिकन अंगारा, चिकन ६५, चिकन महाराजा, चिकन लाजवाब, चिकन चंगेज, चिकन बिर्यानी, चिकन हैद्राबादी, चिकन लजीज, चिकन बोनलेस, ड्राय चिकन, चिकन आचारी, चिकन व्हाईट कोरमा, ग्रीन कोरमा, चिकन हंडी, चिकन भुना, चिकन पटीयाला, चिकन बंगाली, चिकन चिल्ली, चिकन सिलव्हर यासह विविध पदार्थ चिकनपासून बनवले जातात. त्यात सर्वाधिक मागणी चिकन टिक्का, चिकन रोस्टला आहे.

"चिकन टिक्का तयार करण्यासाठी लागणारे मसाले व तेल महाग झाले आहे. त्यामुळे दोनशे रुपये किलोने टिक्का तळून देत आहे. चिकन स्वस्त झाल्याने खवय्ये गर्दी करतात. सायंकाळी पाचनंतर शहरातील चिकन टिक्क्याची दुकाने सुरू होतात. स्वस्ताईच्या काळात चिकन टिक्क्याच्या विक्रीत दुप्पटीने वाढ होते." - शारीक अन्सारी, संचालक, बाबा चिकन टिक्का, मालेगाव.

Professionals frying chicken on Kusumba Street
Nashik Kalyan Local News: इन्स्पेक्शनवरच कल्याण लोकलचे भवितव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com