Salher fire incident
sakal
साल्हेर: भावाच्या विवाहासाठी मोराळापाड्याहून बहिणीचा परिवार आलेला असताना अचानकच बहिणीच्या घराला आग लागल्याची वार्ता धडकली अन दोन किलोमीटरवर असलेल्या बहिणीच्या घराकडे नवरदेवासह पाहुणे मंडळींनी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले, मात्र आगीमध्ये रोख चार लाख व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने भावाच्या विवाहाच्या आनंदावर विरजण पडले.