Nashik News : बिबट्या पिंजऱ्यात, पण पुन्हा तोच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard is in Cage

Nashik News : बिबट्या पिंजऱ्यात, पण पुन्हा तोच!

कसबे सुकेणे : कसबे सुकेणे ते वडाळी नजीक रस्त्यावरील नीलेश रमेश उगले व बबलू परसराम खोडे यांच्या वस्तीनजीक रविवारी (ता.२२) रात्री बाराच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. पंधरा दिवसांपूर्वीच मौजे सुकेणे येथे बिबट्याला पकडण्यात आले होते.

रात्री पुन्हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला असला तरी पंधरा दिवसापासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या परिसरातील जवळपास चार कुत्रे बिबट्याने फस्त केले होते, त्यापैकी तीन कुत्रे हे नीलेश रमेश उगले यांच्या द्राक्षबागेत मृतावस्थेत आढळले. (Same Leopard Again is in Cage of Forest Department Nashik News)

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Nashik : 'जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा'; नाशिकमध्ये साधू-महंत आक्रमक

तेव्हा नीलेश उगले यांनी वनखात्याशी संपर्क करत तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली होती. तीन दिवसापासून या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. रात्री बाराच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा जोरदार आवाज आल्याने पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला हे त्या परिसरातील नागरिकांमध्ये लक्षात आले. सकाळी सहाला वनविभागाला बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती देण्यात आली. सकाळी साडेसातच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.

पंधरा दिवसात दुसरा जेरबंद

वनविभागाचे अधिकारी एका भागातून बिबट्या पकडतात व दुसऱ्या भागात बिबट्या सोडून देतात अशी तक्रार सुकेणा ग्रामस्थांची आहे. बिबट्या पकडल्यानंतरही पुन्हा पुन्हा तो याच परिसरात दिसतो. याचा अर्थ नागरिकांच्या समाधानासाठी बिबट्याला पकडून नेले जाते व पुन्हा सोडून दिले जाते अशी तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम असून कसबे सुकेणे हद्दी बिबट्याला न सोडता तो वनातच सोडला जावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Nashik: आपल्या शक्तीने कॅन्सर बरा करा अन् मिळवा 51 लाख रोख; नाशिकच्या महंतांकडून बक्षिस जाहिर