YEO26B27246
येवला : विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करताना माजी खासदार समीर भुजबळ.समवेत पदाधिकारी.
------------------
३०-२
समीर भुजबळ यांच्या हस्ते
कामांचे भूमिपूजन, लोकार्पण
------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१९ : मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांना चालना देण्यात येत आहे. यापुढील काळातही प्रत्येक गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
मंत्री भुजबळांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या विकासकामांचे समीर भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभाध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, अरुणमामा थोरात, मुख्याधिकारी तुषार आहेर, उपअभियंता हिमांशु चव्हाण आदींची उपस्थिती होती.
लौकी शिरस येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण (२० लाख) तसेच श्रीकृष्ण मंदिरासमोर सभामंडप बांधकामाचे भुमिपूजन (२० लाख), तालुक्यातील प्ररामा-२ ते देशमाने मानोरी मुखेड महालखेडा निमगांव मढ नाटेगांव ते प्ररामा-८, प्रजिमा- ७५ कि.मी ००० ते ४/०० मध्ये सुधारणा कामाचे भुमिपूजन (२ कोटी १० लाख), कालिका माता मंदिर ते दुहेरी रस्तापर्यत कॉक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन (१ कोटी १० लाख) करण्यात आले. दत्ता निकम, दीपक लोणारी, गोटू मांजरे, अमोल शिंदे, बाळासाहेब पिंपरकर, मोहन शेलार, बाळासाहेब गुंड, गणपत कांदळकर, डॉ.प्रवीण बुल्हे, सुहास भांबारे, रतन बोरनारे, साहेबराव आहेर, नवनाथ काळे, देविदास शेळके, सरपंच प्रदीप कानडे, योगेश गांगुर्डे, साहेबराव बोराडे, दत्ताभाऊ कानडे, दीपक गायकवाड, सुमीत थोरात, भूषण लाघवे, सचिन सोनवणे आदी उपस्थित होते.
-----------------