Samruddhi Mahamarg
sakal
नाशिक: समृद्धी महामार्गावर वाहन पंक्चर करण्यासाठी खिळे लावले, असा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली होती. मात्र, हे खिळे नसून रस्त्यावरील सूक्ष्म खड्डे बुजविण्याच्या दुरुस्ती प्रक्रियेत वापरण्यात आलेले ॲल्युमिनियमचे नोझल्स असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आले आहे.