Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचा हा टप्पा देखील पूर्णत्वाकडे | Latest Marathi News | Breaking news Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचा हा टप्पा देखील पूर्णत्वाकडे

नाशिक : कोकमठाण ते पाथरे दरम्यान रस्त्याचे रखडलेले काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरु असल्याने लवरकच समृद्धी महामार्ग ते भरवीर (ता. इगतपुरी) पर्यत रस्ता सुरू होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यापासून पाथरे येथील दीड ते दोन किलोमीटरचे कामकाज ठप्प होते, त्यामुळे अडथळा येत होता.

समृद्धी महामार्गाच्या कामात कोकमठाण ते पाथरे येथील रखडलेल्या सुमारे ११ किलोमीटरच्या कामकाजाचे नियोजनापेक्षा जास्त काळ रखडल्याने संबंधित कामासाठी दुसऱ्या ठेकेदारांकडून करून घेत दीड महिन्यापासून पूर्णत्वास आणले आहे.

सिन्नर ते इगतपुरी दरम्यान भरवीरपर्यतचे कामकाज पूर्ण होत आल्याने आता नागपूरपासून थेट इगतपुरीपर्यत टप्पा ५२ पर्यतचे रखडलेले सुमारे ८५ किलोमीटरचे काम पूर्ण होणार आहे. या मार्गावर लवकरच एप्रिलच्या पूर्वाधात वाहतूक सुरु होण्याचे संकेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले, मात्र, नाशिक जिल्ह्यातील कामकाज अपूर्णच होते. त्यात कोकमठाण ते पाथरे भागातील सुमारे ११ किलोमीटरचे काम रखडलेले होते. तेथील ठेकेदार बदलल्यानंतर पुन्हा कामाला गती मिळत गेली.

त्याचवेळी सिन्नर ते इगतपुरी दरम्यानच्या टप्प्याचे कामकाज पूर्ण नव्हते, ते आता पूर्ण होत आले आहे. भरवीरपर्यतच्या कामकाजामुळे सिन्नर ते इगतपुरी असे एकाचवेळी दोन्ही टप्प्यातील कामामुळे आणखी ८० ते ८५ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

''कोकमठाण ते पाथरेपर्यंतच्या महामार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. उद्घाटनाची तारीख ठरविण्याची प्रतीक्षा आहे. कोणत्याही क्षणी हा रस्ता वाहतुकीला खुला होईल. इगतपुरीपर्यंतचा रस्ता सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही अवधी लागेल.'' - व्ही. आर. सातपुते, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ.