Nashik Metro : पंतप्रधान कार्यालयाकडून ‘मेट्रो’चा अहवाल मागविला

Nashik Metro
Nashik Metroesakal

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यात मेट्रोचा प्रश्न मला लागेल असे आश्वासन नाशिककरांना दिल्यानंतर त्याअनुषंगाने पंतप्रधान कार्यालयाकडून मेट्रो प्रकल्पाचा अहवाल मागविण्यात आला आहे.

या अहवालात तांत्रिक माहिती देण्यात आली असून, मेट्रो निओ प्रकल्पाला चाल मिळणार आहे. त्याचबरोबर मल्टीमॉडेल हब संदर्भातदेखील माहिती घेण्यात आली.

Nashik Metro
Nashik News : समृद्धीमार्गे धावणाऱ्या शिर्डी- नागपूर बस सेवेला ब्रेक!

देशातील पहिला टायर बेस्ट मेट्रो निओ प्रकल्प नाशिकमध्ये सरकारला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी देऊन केंद्र शासनाकडे सादर केला होता. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्रकल्पाची घोषणा केली.

जवळपास दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली. परंतु प्रकल्पाचा अद्यापही नारळ फुटल्याने प्रकल्प होईल की नाही, याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. मागील महिन्यात भाजप कार्यकारणीची बैठक झाली. या कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन महिन्यात मेट्रो निओ प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन दिले होते.

Nashik Metro
Nashik Crime News : महामार्गावर मोबाईल लुटणाऱ्या दोघांना दुचाकीसह अटक

त्याअनुषंगाने बुधवारी (ता. १५) पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार सचिवांनी मेट्रो नियोजन सविस्तर प्रकल्प आराखड्याची मागणी केली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महामेट्रो, महारेल व महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.

तसेच महामेट्रोकडून ब्रिजेश दीक्षित तर महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते. पंतप्रधान कार्यालयाची सल्लागार सचिव शर्मा यांनी महा मेट्रोची तांत्रिक माहिती घेतली.

Nashik Metro
Nashik Fraud Crime : ऑनलाइन वीजबिल भरणे पडले महाग

मल्टीमॉडेल हब साकारणार

नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथे मल्टीमॉडेल हब तयार केले जाणार आहे. महापालिका मेट्रो व रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने मल्टीमॉडेल हब उभारले जाणार आहे. मल्टीमॉडेल हब संदर्भातदेखील बैठकीत माहिती घेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com