नाशिक- जिल्ह्यातील २६ वाळूघाटांना जिल्हास्तरीय समितीने पर्यावरणीय निकषांची पूर्तता झाल्यामुळे वाळू उत्खननासाठी परवानगी दिली आहे. मात्र, १५ वाळूघाट पर्यावरणीय निकषांत न बसल्यामुळे त्यांना नकार देण्यात आला असून, या घाटांवर जिल्हा प्रशासनाने फुली मारली आहे. यामधून एकूण एक लाख २० हजार ३३६ ब्रास वाळू उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.