Nashik-Pune Highway
sakal
संगमनेर: पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (ता.७) पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झाल्याने हजारो प्रवाशांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. घारगाव ते माहुली (ता. संगमनेर) दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावर तासनतास अडकून पडलेल्या प्रवाशांनी संबंधित विभागाच्या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.