नाशिक- शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या २४७ किलोमीटरचे नवीन रस्ते व रुंदीकरणाला कट बसणार असताना ‘मिसिंग लिंक’ देखील अडचणीत सापडले आहे. मिसिंग लिंक ताब्यात घेण्यापासून ते पूर्णपणे विकसित करण्यापर्यंतचा कालावधी लक्षात घेता सिंहस्थापूर्वी काम शक्य नसल्याने अशा प्रकारचे रस्ते रद्द करण्याची तयारी बांधकाम विभागाने सुरू केली आहे.