esakal | ‘वंचित’च्या दणक्यानंतर स्वच्छता अभियान
sakal

बोलून बातमी शोधा

‘वंचित’च्या दणक्यानंतर स्वच्छता अभियान

‘वंचित’च्या दणक्यानंतर स्वच्छता अभियान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिडको : चुंचाळे शिवारातील घरकुल योजना परिसरातील घाणीचे साम्राज्य दूर करावे, तसेच या परिसरातील लोकांना मूलभूत सोयी- सुविधा त्वरित उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. या परिसरातील २० टन कचरा एकाच दिवसात उचलून तो पुढील प्रक्रियेसाठी खत प्रकल्पात नेल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

या परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने लोकांना नाकावर रुमाल ठेवून चालावे लागते. रोगराई मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. २५ हजार लोकवस्ती परिसराच्या स्वच्छतेसाठी अवघे ५ कर्मचारी आणि तेही फक्त सेल्फी काढून पाठवीत आणि काम काय करीत होते हा खरा तर संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच परिसरात कचऱ्याचे ढीग साचले होते. परंतु, आयुक्तांनी यात जातीने लक्ष घातल्यानंतर आरोग्य खात्याच्या १५ ते २० कर्मचाऱ्यांच्या पथकाने एका दिवसांत २० टन कचरा संकलन परिसर स्वच्छ केला. वंचित आघाडीचे ५० स्वयंसेवकही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. शनिवारी आणखी ५० कर्मचारी आणून, हा संपूर्ण परिसर चकाचक करण्यात येईल, असे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. या परिसरा कायम स्वच्छ राहावा, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिले.

"रस्ते त्वरित दुरुस्त करून ड्रेनेजची पाइपलाइन त्वरित टाकण्यात यावी. जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात. ज्या भागात घंटागाडी पोचू शकत नाही तेथे हातगाडीमार्फत कचरा उचलण्याची सोय करावी. बंद पथदीप त्वरित व पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करावा. परिसरातील जलकुंभाची नित्यनियमाने स्वच्छता व्हावी व लोकांना स्वच्छ पाणी पुरवावे.

- अविनाश शिंदे, महानगर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, नाशिक

loading image
go to top