अग्निशमन सेवा सहाय्यक संचालकपदी नाशिक जिल्ह्यासाठी संजय बैरागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Assistant Director of Fire Services

अग्निशमन सेवा सहाय्यक संचालकपदी नाशिक जिल्ह्यासाठी संजय बैरागी

नाशिक : शासनाने नव्याने स्थापन केलेल्या अग्निशमन सेवा सहाय्यक संचालकपदी नाशिक जिल्ह्यासाठी नाशिक महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाने नव्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी हे पद निर्माण केले आहे. यापूर्वी 1 अग्निशमन संचालक व 1 सहाय्यक संचालक हीच पदे अस्तित्वात होती, संपूर्ण राज्याचा भार या पदांवर येत होता, त्यामुळे शासनाने कामाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला, आता मनपा आणि नपा वगळता अन्य संपूर्ण जिल्ह्यातील अग्निशमन परवानगी, नाहरकत दाखले या कार्यालयामार्फत दिले जाणार आहेत. संजय बैरागी यांनी या पदासाठीची शैक्षणिक अर्हता पूर्ण केली असल्याने शासनाने त्यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा: नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार,अखेर शिक्कामोर्तब

हेही वाचा: महाजनांच्या विवाह सोहळ्याला इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

Web Title: Sanjay Bairagi For Nashik District As Assistant Director Of Fire Services

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top