Sanjay Raut Nashik Daura : भाजप, बाळासाहेबांची शिवसेना संजय राऊतांना झटका देणार?

Sanjay Raut
Sanjay Rautesakal

"शिवसेनेचे खासदार संजय राऊत ज्यावेळी नाशिकमध्ये येतात व नाशिक मधून परतत नाही तोच बाळासाहेबांची शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाकडून संजय राऊत यांना झटका देण्याचे काम होते. आता राऊत हे पुन्हा नाशिकच्या दौऱ्यावर मंगळवारी (ता.१४) पासून येत आहे. परंतु, यावेळी भाजपचे दोन दिवसीय राज्यव्यापी बैठक झाल्यानंतर ते नाशिक मध्ये येत असल्याने त्यांच्या या उलटफेर रचनेत ते भाजप किंवा बाळासाहेबांच्या शिवसेनेला झटका देतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."

- विक्रांत मते, नाशिक

(Sanjay Raut Nashik Daura BJP Balasaheb Shiv Sena attack Sanjay Raut nashik political news)

जून महिन्यात महाविकास आघाडीत फूट पडून शिवसेनेचे आमदारांनी स्वतंत्र गट तयार केला व भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यात कुरघोडीचे राजकारण टोकाला गेले. खासदार राऊत हे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख आहेत.

राऊत नाशिकमध्ये आल्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याची डागडुजी करतात. मात्र ते मुंबईत पोहचत नाही, तोच भाजप किंवा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून त्यांना झटका दिला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जितक्या वेळा खासदार राऊत नाशिकमध्ये आले.

तितक्या वेळा शिवसेनाफोडून त्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप किंवा बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामावून घेतले गेले. आता खासदार संजय राऊत हे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Sanjay Raut
Nashik News : घरपट्टी वसुली दीडशे कोटींच्या पुढे

त्यांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे दोन दिवशी राज्यव्यापी बैठक झाल्यानंतर ते येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीतून संवाद घडून आणला जाणार आहे.

मंगळवारी (ता. १४) दुपारी चारला त्यांचे नाशिकमध्ये आगमन होईल. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होईल.

शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, कृणाल दराडे, आमदार नरेंद्र दराडे, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, अनिल कदम हे खासदार राऊत यांच्या दौऱ्यात सहभागी होतील.

Sanjay Raut
Examination Rules : दहावी, बारावीच्‍या परीक्षेत वेळेआधी मिळणार नाही प्रश्‍नपत्रिका; हे आहेत बदल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com