Sanjay Raut Nashik Daura : क्रिकेट, भेटीगाठी, बैठका अन् बरच काही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut news

Sanjay Raut Nashik Daura : क्रिकेट, भेटीगाठी, बैठका अन् बरच काही...

नाशिक : शिवसेना भवनातून पक्ष चालतो. महापालिका निवडणूकीसाठी परस्पर येथे कोणाच्या नावावर फुल्या नको, अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रस्थापितांना उघडउघड इशारा दिला. (Sanjay Raut Nashik Daura convey message that party running from Shiv Sena Bhavan Nashik Political News)

जामिनावर बाहेर आल्यानंतर शुक्रवारी (ता. २) प्रथमच नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा केली. शिवसेनेतून फुटलेल्या खासदार हेमंत गोडसे यांना पर्याय कोण याचा विचार सुरू केला आहे. तसेच ‘वन टू बन' संवाद साधताना नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी ऐकून घेतली. दुपारनंतर नांदगावला मेळावा घेतला. क्रिकेटशी तसा संबंध आलेला नसतांनाही नाशिकला राऊत यांनी थोडा वेळ बॅटही हातात धरत पुन्हा मैदानात उतरल्याचे दाखवून दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत नाशिकला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण सुरू झाले आहे. आज अमुक इतके नगरसेवक फुटणार, तमूक नगरसेवक फुटणार, अशा चर्चा घडविल्या जात आहे. अशा चर्चा घडवीत पक्षअंतंर्गत उमेदवारीच्या स्पर्धकांना गद्दार ठरवून महापालिका निवडणुकीतील उमेदवारीच्या स्पर्धेतून संपविण्याचे प्रकार शहरात सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अशा चर्चा घडविणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

चर्चा रंगविणाऱ्यांना सूचक इशारा

उगाचच शिंदे गटाशी नाव जोडून सोयीच्या लोकांना उमेदवारी देण्याचे घाट सुरू झाल्याचे प्रकार त्यांच्यापर्यंत पोचविले गेले. त्यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत उघडउघड इशारा सूचक इशारा देताना परस्पर येथे कोणाच्याही उमेदवारीवर फुल्या लागणार नाही, असे स्पष्ट केले. स्पर्धक संपविण्यासाठी अमुक लोक फुटणार, तमूक फुटणार अशा चर्चा रंगविणाऱ्यांना त्यांना सूचक इशारा दिला.

पत्रकार परिषदेतही २०१७ च्या महापालिका उमेदवारी वाटपाचा विषय काढू नका, पण पदाधिकाऱ्यांना गद्दार ठरविणाऱ्या चर्चा घडवीत स्थानिक पातळीवर कोणीही उमेदवारीवर फुल्या मारू शकणार नाही. शिवसेना भवनातून शिवसेना पक्ष चालविला जातो. येथे परस्पर कोणीही कोणाच्या उमेदवारीवर फुल्या मारू शकणार नाही, असा दावा केला.