Shiv Sena Thackeray Group News: रावणशाहीसमोर झुकणार नाही; शिवसेनेच्या अधिवेशनात राऊत, अंधारे यांची सडकून टीका

शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी रामायणांचे उदाहरणे देत, भाजपाच्या कार्यपदधतीवर ताशेरे ओढले तर, सुषमा अंधारे यांनी भाजपा-शिंदे सरकारवर तिखट भाषेत आसुडच ओढले.
sanjay Raut sushma Andhare criticize bjp shinde group in Shiv Sena Thackeray Group convention
sanjay Raut sushma Andhare criticize bjp shinde group in Shiv Sena Thackeray Group conventionesakal

नाशिक : शिवसेनेच्या उबाठा गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली. अधिवेशनासाठी आलेल्या पदाधिकार्यांनी घोषणाबाजीने परिसरत दणाणून सोडला होता. तर भगव्या झेंड्यांनी परिसर भगवामय झाला होता.

त्यात जोश भरला तो, वक्त्यांच्या भाषणांनी. शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी रामायणांचे उदाहरणे देत, भाजपाच्या कार्यपदधतीवर ताशेरे ओढले तर, सुषमा अंधारे यांनी भाजपा-शिंदे सरकारवर तिखट भाषेत आसुडच ओढले. (sanjay Raut sushma Andhare criticize bjp shinde group in Shiv Sena Thackeray Group convention at nashik)

त्र्यंबकरोडवरील हॉटेल ड्रेमोक्रॉसी येथे शिवसेनेच्या उबाठा गटाचे राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्‌घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी युवासेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, प्रवक्ते व खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, भास्कर जाधव, सचिन आहिर, ओमराजे निंबाळकर, सुनील प्रभु आदींसह पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

राज्यवापी अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे अडीच ते तीन हजार नेते, पदाधिकारी, शिवसैनिक सामील झाले होते. स्थानिक पदाधिकारी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुनील बागुल, दीपक दातीर, भागवत आरोटे आदींनी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

sanjay Raut sushma Andhare criticize bjp shinde group in Shiv Sena Thackeray Group convention
Thackeray in Nashik: 'शिवसेना नसती तर... काल अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा होऊ शकली नसती', ठाकरे गटाच्या खासदाराचं मोठं वक्तव्य

यावेळी खासदार राऊत म्हणाले, सध्या देशात राममय वातावरण आहे. परंतु हे बाळासाहेबांच्या शिवसेनेशिवाय अशक्य होते. ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी आज श्रेय घेणाऱ्यांनी पाठ दाखविली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ठणकावून जबाबदारी स्वीकारली होती.

त्यामुळे प्रभु रामाशी शिवसेनेचे जुने नातेच नव्हे तर जिव्हाळ्याचे नाते आहे. रामामध्ये असलेला संयम, धैर्य, नितीमत्ता शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांकडे आहे. संयम आणि धैर्य असलेले आमचे उद्धव ठाकरे दिल्लीच्या रावणशाहीपुढे कधीही झुकणार नाहीत.

देशातच नव्हे, राज्यात, नाशिकमध्ये जास्त रामायण घडते आहे. याच नाशिकमध्ये रामाने शुर्पनखेचे नाक कापले होते. याच नाशिकमध्ये शिवसेनेने १९९५ चे अधिवेशन घेत राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती, याच नाशिकमध्ये आज पुन्हा शिवसेनेचे अधिवेशन होते असून, सेनेच्या आगामी सत्तेची ही नांदी आहे. रामाच्या हाती आता धनुष्य नव्हे तर मशाल असेल आणि ती मशाल राज्यभर पेटून उठेल अन् अवघा महाराष्ट्र प्रकाशमय करणार असल्याचे ते म्हणाले.

रामायणातला रावण अजिंक्य नव्हता, अन्‌ आजचा तथाकथित रावणही नाही असे सांगत, खासदार राऊत म्हणाले, हनुमानालाही अटक केली होती. रावणासमोर हजर केले गेले आणि त्याच्य शेवटीला आग लावली. तेल रावणाचे, लंका रावणाची आणि आगीत भस्मसात झाली तीही रावणाची लंका.

त्यामुळे आत्मविश्वासाच्या जोरावर मोदी, फडणवीस, शिंदे, पवार यांचाही पराभव शिवसैनिक करतील असा निर्धाराची हाक देतानाच, शिवसेनेचा वाघही सुरक्षित आहे अन्‌ बछडेही असा सूचक संदेश खासदार राऊत यांनी विरोधकांना दिला. यावेळी खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

sanjay Raut sushma Andhare criticize bjp shinde group in Shiv Sena Thackeray Group convention
Thackeray Group Nashik Rally: "...तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल"; उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

रामराज्य कुठे आहे.... : सुषमा अंधारे

पांढरी दाढी अन्‌ मोठी-छोठी भाभी अशी उपहासात्मक टीका करताना, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. राम एकवचनी, एक पत्नी होता. पण कालच्या सोहळ्यात पत्नीला वनवासात टाकून रामाची पूजा केली जात होती.

एकवचनी तरी कसे म्हणायचे, जे रात्रीतून लव्हमॅरेज करतात. रामराज्य आणण्याची भाषा करणाऱ्यांच्या देशात भरदिवसा महिलांवर अत्याचार होतात. खेळाडूंवर अत्याचार होतात, त्यांना न्याय मिळत नाही.

महिलांचा सन्मान पायदळी तुटविणारे आता महिलांना आरक्षणाचे गाजर दाखवत आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी जातीनिहाय जनगनना करावी. त्याशिवाय महिलांना आरक्षण मिळूच शकणार नाही. राज्यात सुडाचे राजकारण केले जात आहे.

राहुल नार्वेकरांसारखे शकुनी फासे पाडतात. परंतु प्रत्यक्ष मैदानावर जेव्हा लढाई होईल, त्यावेळी असत्याचा चेहरा उघडा पाडल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

शेलकी भाषेत टीका

ज्यांना राजकारणाचा र्र कळत नाही, तो दीड-दोन फुटाचं फुकाच्या उड्या मारतंय. आमच्या महिलांवर अश्लिल भाषेत टीका करतोय, अशी टीका नितेश राणे यांचा नामोल्लेख न करता शेलकी भाषेत टीका केली.

आम्हाला लढण्याचा वारसा असून, आमच्या कोणत्याही नेत्याने महिलांविषयी अनुद्गार काढलेले नाहीत. मात्र, आम्ही गद्दारांना त्यांची जागा दाखवू असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. 

sanjay Raut sushma Andhare criticize bjp shinde group in Shiv Sena Thackeray Group convention
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केली बाळासाहेबांसोबतची नाशिक अधिवेशनाची एक आठवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com