राष्ट्रीय स्‍पर्धेत संजीवनीला सुवर्णपदक

संजीवनी जाधवने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले
संजीवनी जाधवने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिलेesakal

नाशिक : चेन्नई (तमिळनाडू) येथे झालेल्‍या ६१ व्‍या राष्ट्रीय आंतरराज्‍य वरिष्ठ गट अजिंक्‍यपद स्‍पर्धेत नाशिकच्‍या संजीवनी जाधवने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. महिलांच्‍या पाच हजार मीटर गटातून धावताना संजीवनीने अव्वल क्रमांकासह सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

संजीवनी जाधवने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले
मनमाडची आकांक्षा ठरली रौप्यपदकाची मानकरी

स्‍पर्धेत सहभागी होताना संजीवनीने लक्षवेधी कामगिरी केली आहे. पाच हजार मीटर महिलांच्‍या गटातून महाराष्ट्राकडून धावताना तिने १६ मिनीटे ११.४६ सेकंदात स्‍पर्धा पूर्ण करून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. या गटातून गुजरातच्या श्रद्धाने १६ मिनीटे १४.०४ सेकंद अशी वेळ नोंदवीत द्वितीय क्रमांक पटकावताना रौप्‍य पदक जिंकले. तर हिमाचल प्रदेशच्‍या सीमा हिने १६ मिनीटे २५.४७ सेकंद अशी वेळ नोंदविताना तृतीय क्रमांकासह कास्‍यपदक पटकावले आहे. स्‍पर्धेत सुवर्णपदक विजेती संजीवनी ही नाशिकच्‍या एकलव्‍य ॲथलेटिक्‍स ॲण्ड स्पोर्ट्स इन्‍स्‍टिट्यूटची खेळाडू असून ती महिंद्रा ॲण्ड महिंद्रा पुरस्‍कृत खेळाडू आहे. खेलो इंडियाच्‍या भोसला विद्यालय केंद्रांवर ती विजेंद्र सिंग यांच्‍या मार्गदर्शनाखाली सराव करते.

संजीवनी जाधवने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले
Nashik : पाचवर्षीय कायराचा 7 महिन्यात दोनदा वर्ल्ड रेकॉर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com