Traffic
sakal
लखमापूर: दिंडोरी शहरातील चिंचोळा रस्ता, हातगाड्यांची गर्दी आणि मध्येच रस्त्यात उभी केली जाणारी वाहने यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गडावर जाणारे पर्यटक, कारखान्यामुळे वाढलेली अवजड वाहतूक आणि लोकांकडे वाढलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे.