Radtondi Ghat
sakal
वणी: आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर जाण्या-येण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगड घाट रस्त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने (कळवण) प्रस्तावित पर्यायी रडतोंडी घाटरस्त्याच्या कामास चालना देण्यासाठी सर्वेक्षण, भूसंपादन, वनजमीन संपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या कामासाठी एक कोटी ५५ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले. शासनाने या प्रस्तावासह अंदाजपत्रकास तातडीने मंजुरी दिल्यास पर्यायी रडतोंडी घाट मार्गाच्या कामास चालना मिळणार आहे.