ST Bus
sakal
नाशिक: नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगगडावर दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, भाविक प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. उत्सवकाळात विविध ठिकाणाहून एकूण ३२० बसगाड्या भाविक प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. तसेच या कालावधीत घाटात खासगी वाहनांसाठी रस्ता बंद ठेवला जाणार असल्याने, नांदुरीहून १४० जादा बसगाड्या उपलब्ध असतील.