Navratri festival
sakal
वणी: “न मावे रूप तुझे माझिया नयने, काय वर्णू मी ललिता मात्सत्रिपुरे...” अशा स्तोत्ररूपी स्तुतिसुमनांनी भाविकांनी सप्तशृंगीमातेला वंदन केले. अश्विन शुद्ध पंचमी अर्थात ललिता पंचमीनिमित्त लाखो भक्तांनी आदिमायेच्या चरणी नतमस्तक होत नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी गडावर भक्तिभावाची उधळण केली. षष्ठी तिथीला रविवार (ता. २८) सुटीचा दिवस लाभल्याने गडावर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.