Saptashrungi Chaitraotsav: पदयात्रेकरूंसाठी निवारामंडप ठरला वरदान! जास्त थांबता आल्याचे भाविकांना समाधान

saptashrungi Devi News
saptashrungi Devi Newsesakal

Saptashrungi Chaitraotsav : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर आदिमायेच्या मूर्तीसंवर्धन कार्यानंतर स्वयंभू मूळस्वरुपातील आदिमायेचा पहिला चैत्रोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात ८ ते ९ लाख भाविकांच्या उपस्थित झाला.

यंदाच्या चैत्रोत्सवात सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने प्रथमच हजारावर भाविक विश्रांती घेवू शकतील असा ‘वॉटरप्रुफ’ मंडप उभारून भाविकांची यात्रा सुखकर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (Saptashrungi Chaitraotsav Shelter helps Devotees satisfied that they stay longer nashik news)

सप्तशृंगीदेवी मंदिरातील चैत्री नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यासाठी खानदेशासतून मोठ्या प्रमाणे सर्वसामान्य भाविक पदयात्रेने येत असतात. रणरणत्या उन्हात येणाऱ्या या भाविकांसाठी गडावर मोफत निवास व्यवस्था नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते.

चैत्राच्या रखरखत्या उन्हात पायी चालत येणं हे श्रध्देचे प्रतीक आहे. शेकडो मैल अंतरावरुन मजल दरमजल करीत आदिमायेच्या दरबारी आल्यानंतर काही तास तरी दर्शन घेवून गडावर थांबावे अशी प्रत्येक भाविकांची मनोमन इच्छा असते,

मात्र गडावरील ट्रस्टची धर्मशाळा, भक्तनिवासातील चाळीस टक्के जागा या प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. खासगी लॉजिंगमध्येही जागा नसते किंवा तेथील दर सामान्यांना न परवडणारे असतात.

याबाबत सप्तशृंग यात्रोत्सवाच्या आढावा बैठकीत प्रश्न उपस्थित झाल्याने, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळाने यावर गांभीर्य दर्शवित भाविकांच्या निवासासाठी वॉटर प्रुफ मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. तातडीने त्याची अमंलबजावणी करीत १०० बाय १३० फुट आकाराचा वॉटरप्रुफ मंडप शिवालय तलावाजवळील मैदानात उभारला.

मंडपात तसेच परिसरात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था, जवळच पिण्याचे पाणी, तात्पुरते शौचालय उभारून सर्वसामान्य भाविकांच्या निवास व भौतिक गरजांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला. या मंडपाचा आलेल्या भाविकांनी पुरेपूर वापर केल्याने ट्रस्टने मंडप उभारण्यासाठी केलेला खर्चही सत्कारणी लागला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

saptashrungi Devi News
Nashik News : शाहु जोंधळे, रिया गाडेकरचा राष्ट्रीय स्तरावर डंका! आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे गौरव

भाविक व विश्वस्त मंडळही समाधान व्यक्त करीत आहे. ट्रस्टने निवारा मंडपांची व्यवस्था करुन दिलासा दिला असला तरी भाविकांची यात्रा कालावधीत संख्या लक्षात घेता यापुढे किमान तीन मंडप तरी उभारावे अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

"गडावर प्रथमच ट्रस्टने निवारा मंडप दिल्याने आम्हा पदयात्रेकरूंना काही तास का होईना विश्रांतीसाठी सुरक्षित जागा मिळाल्याने समाधान वाटले, मंडपातील स्वच्छता चांगली होती. भाविकांची गर्दी लक्षात ट्रस्टने निवारा मंडप वाढविणे गरजेचे आहे."

- सचिन नेरकर, भाविक, धुळे.

"ट्रस्ट विश्वस्त मंडळात यात्रोत्सव काळात भाविकांच्या निवारा मंडप उभारण्याबाबत चर्चा झाली. ट्रस्टचे अध्यक्ष वर्धन देसाई यांनीही यास प्रतिसाद दिला. ट्रस्टला माफक दरात मंडप उपलब्ध करून देण्याबरोबरच मंडपात भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी यात्रोत्सव काळात कार्यरत होता. निवारा मंडपाचा हजारो भाविकांनी लाभ घेतल्याने समाधान वाटले."

- अॅड. ललित निकम, विश्वस्त, सप्तशृंगगड.

"गडावर यात्रोत्सवात निवासाची पुरेशी निशुल्क व्यवस्था नसल्याने गरीब, सर्वसामान्य भाविकांची गैरसोय होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे यासाठी प्रयत्नशील होतो. पालकमंत्री दादा भुसे यांनी त्याची दखल घेतली असून लवकरच सुमारे ७० लाखांचे निवासगृहाचे बांधकामास मंजुरी मिळूण काम सुरु होणार आहे."

- राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगगड.

saptashrungi Devi News
Sinnar Bazar Samiti : सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षा चमत्काराची!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com