Navaratri Festival: चांदीच्या नक्षीकामाने गाभारा चकाकणार! पहिल्या माळेला भाविकांना घडणार आदिमायेचे तेजोमय दर्शन

This is how the gabhara of the temple will look like
This is how the gabhara of the temple will look like

Navaratri Festival : आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेच्या मूर्तीसंवर्धन कार्यादरम्यान आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यांतून काढण्यात आलेले चांदीचे नक्षीकामाचे पत्रे तसेच काढलेली कमान सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने भाविकांच्या देणगीतून नव्याने तयार करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी आदिमायेच्या मंदिराचा गाभारा चांदीच्या आकर्षक नक्षीदार सजावटीने चकाकणार असून त्यात आदिमायेची आश्वासक मूर्तीचे तेजोमय दर्शन भाविकांना घडणार आहे.

श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडावर श्री भगवतीच्या मूर्ती संवर्धनाच्या कार्यानंतर देशभरातील १०८ शक्तिपीठांपैकी स्वयंभू आदिशक्तीपीठ म्हणून सप्तशृंगीगडाचा उल्लेख होऊ लागला आहे. (saptashrungi devi gabhara will be decorating with attractive silver nashik news)

या मूर्तीसंवर्धन कार्यादरम्यान पूर्वीच्या मूर्तीभोवतीचे चांदीच्या नक्षीकामाची कमान काढण्यात आली होती. त्यानंतर सप्तशृंगी निवासिनी देवी विश्वस्त मंडळाने नवरुपातील आदिमायेच्या सोन्या चांदीचे काही आभूषणांतही मूर्तीला साजेसे नवअलंकार भाविकांच्या देणगीतून तयार केले.

मंदिर गाभाऱ्यातील सजावटीसाठी भाविकांनी अर्पण केलेले तसेच ट्रस्टकडे असलेल्या अंदाजे ८०० किलो चांदीपासून आदिमायेच्या मूर्तीस व गाभाऱ्यात साजेशी चांदीचे नक्षीदार पत्रे लावून सजावट करण्याचे काम हाती घेतले.

यासाठी पी. एन. गाडगीळ या प्रसिद्ध ज्वेलर्सनी सेवाभावाने चांदीचे नक्षीकाम व मंदिराअंतर्गत सजावट करून देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी खास उदयपूर येथील कारागिरांनच्या साह्याने चांदीची डिझाईन तयार केली असून ट्रस्टच्या बांधकाम समिती प्रमुख व विश्वस्त भूषणराज तळेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे यांच्यासह ट्रस्टच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित मंगळवार (ता.१०) पासून रात्री मंदिर बंद झाल्यानंतर गाभाऱ्यातील चांदीचे नक्षीकाम बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

This is how the gabhara of the temple will look like
Saptashrungi Gad : आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडाचा चेहरामोहरा बदलणार! ही विकासकामे होणार

येत्या दोन दिवसांत चांदीचे अंतर्गत सजावटीचे काम पूर्णत्वास येणार आहे. आदिमायेच्या मूर्तीसमोरील चौथऱ्यावरील दर्शन पावलांसह सर्व चौथऱ्यास चांदीचे नक्षीदार आवरण चढविण्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे यांनी दिली.

"श्री सप्तशृंगी मंदिराच्या गाभाऱ्यातील अंतर्गत सुशोभीकरण व सजावटीचे काम ट्रस्टने सुरू केले आहे. भाविकांना दर्शनास अडथळा होऊ नये म्हणून रात्री स्वत: उपस्थित राहून कामे करून घेत आहे. यासाठी उदयपूर येथून खास कारागीर आलेले असून दोन दिवसांत काम पूर्ण व्हावे याचे नियोजन केले आहे. पहिल्या माळेस भाविकांना चांदीच्या सजावटीने सुशोभित असलेल्या मंदिर गाभाऱ्यासह आदिमायेचे दर्शन घडणार आहे." - भूषणराज तळेकर, विश्वस्त सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट

This is how the gabhara of the temple will look like
Navaratri 2022 : पुराणापासून चालत आलेल्या आणि प्रेरणा देणाऱ्या नवदुर्गा..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com