
Saptashrung Gad : श्री अन्नपूर्णा प्रसादालयातील स्वयंपाकगृह इपॉक्सी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाले अद्यावत!
वणी (जि. नाशिक) : आद्यशक्तीपीठ सप्तशृंग गडावरील श्री भगवतीची मंदीर व्यवस्थापन समिती असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अन्नपूर्णा प्रसादालयाच्या स्वयंपाकगृहास इपॉक्सी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सनराईजा प्रायव्हेट लिमिटेड, नाशिकच्या सेवा व देणगीच्या रुपाने नुकतेच अद्ययावत करण्यात आले आहे. (Saptashrungi devi gad wani kitchen in Shree Annapurna Prasadalaya updated through epoxy technology nashik news)
आदिमायेच्या दर्शनासाठी दररोज गडावर येणाऱ्या हजारो भाविकांना संस्थानच्या अन्नपूर्णा प्रसादालयात अल्पदरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यासाठी अन्नपूर्णा प्रसादालय ही अद्यावत व्यवस्था कार्यरत असून नुकतेच केंद्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन समितीने भोग प्रमाणपत्राच्या माध्यमातून विश्वस्त संस्थेच्या प्रसादालय विभागातील महाप्रसाद सेवा सुविधेस उत्तर महाराष्ट्रातील सर्वप्रथम सुरक्षित अन्न सुविधेच्या प्रमाणपत्र देवून पुरस्कृत केले आहे.
महाप्रसाद प्रक्रियेतील भोग प्रमाणपत्राच्या महत्वपूर्ण तरतूद म्हणून प्रसादालय विभागाच्या स्वयंपाकगृहास इपॉक्सी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नुकतेच अद्ययावत करण्यात आले असून त्यासाठी मे. सनराईजा प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक चे सर्वेसर्वा तसेच देणगीदार भाविक श्री युवराज पाटील यांनी नि:शुल्क प्रकारात सेवा सुविधेच्या माध्यमातून विशेष योगदान दिले आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सदर संपूर्ण प्रक्रियेसाठी रु. ३.५ लक्ष रक्कमेचे साहित्य व सेवा प्रकारात योगदान युवराज पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. अद्यावत झालेल्या स्वयंपाक कक्ष भाविकांच्या सुविधेत कार्यान्वित दि. २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर विश्वस्त डॉ. श्री. प्रशांत देवरे, विश्वस्त सौ. मनज्योत पाटील, श्री युवराज पाटील व मा. उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
प्रसंगी सौ अरुणादेवी पाटील, सौ. शीतल कुलकर्णी, अशोक होन, किरण हसळकर, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट प्रमुख प्रकाश पगार, बांधकाम प्रमुख नानाजी काकलीज, सुरक्षा प्रमुख यशवंत देशमुख, प्रसादालाय पर्यवेक्षक रामचंद्र पवार, राजेंद्र पवार व मुरली गावित आदी उपस्थितीत होते.