
Nashik News: योजनांची माहिती मिळवा घरबसल्या; आदिवासी आयुक्तालयामार्फत आजपासून Toll Free क्रमांक सुरू
नाशिक : आदिवासी विकास विभागांकडून अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.
त्या योजनांची माहिती देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत 1800 267 0007 हा टोल फ्री क्रमांक गुरुवार (ता.२६) प्रजासत्ताक दिनापासून सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली. (Get information on schemes from your home Toll Free number started from today through Tribal Commissionerate Nashik News)
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत या टोल फ्री क्रमांकावरून मिळणार आहे, असेही आदिवासी आयुक्त गुंडे यांनी सांगितले.