Nashik News : नववर्षानिमित्त आदिमायेचे मंदिर राहणार 24 तास खुले

Saptashrungi Devi Wani gad
Saptashrungi Devi Wani gadesakal

वणी (जि. नाशिक) : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिर नवर्षानिमित्त शनिवारी (ता. ३१) भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. (saptashrungi devi temple will open 24 hours on occasion of New Year Nashik News)

येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातून, राज्याच्या बाहेरूनसुद्धा भाविक नवीन वर्षाला दर्शन घेण्यासाठी सप्तशृंगगडावर हजेरी लावतात. नवीन वर्षाची सुरवात भगवतीच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते.

त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. तसेच या वर्षी वीकेंडला आलेली ३१ डिसेंबर व रविवारी आलेली १ जानेवारी यामुळे सर्वच शासकीय कार्यलयांना असलेल्या सलग दोन दिवस सुट्या तसेच बहुतांश शाळांनाही नाताळच्या सुट्या यामुळे राज्य व राज्याबाहेरील चाकरमाने तीर्थटन व पर्यटनासाठी घराबाहेर पडली असल्याने ३१ डिसेंबर व रविवारी (ता. १) सप्तशृंगगडावर भाविकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

हे गृहित धरून सप्तशृंगी निवासिनी देवी न्यास विश्वस्त मंडळाने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आदिमायेचे मंदिर ३१ डिसेंबरला २४ तास उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Saptashrungi Devi Wani gad
Nashik News : विद्यार्थी आधार कार्ड खरी परीक्षा शिक्षकांची? तांत्रिक अडचणींमुळे रिजेक्ट

सप्तशृंगी मातेच्या मंदिरच्या धार्मिक विधी नियमित वेळेप्रमाणे होणार आहे. भाविकांना कोविड नियमांचे पालन करण्यासाठी केवळ मास्क सक्ती करण्यात आली आहे. भाविकांनी गर्दीचा अंदाज लक्षात घेता मंदिर व प्रसादालय व अन्य गर्दीच्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

भाविकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या सुचवलेल्या नियमांचे भाविकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. १ जानेवारीला रात्री नऊपर्यंत मंदिर खुले राहणार आहे.

Saptashrungi Devi Wani gad
Nashik News : पिंपळगावच्या थोरातांची लेक देवळा ‘नगराध्यक्षपदी’!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com