Saptashrungi Temple : नवनियुक्त विश्वस्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण; उच्च न्यायालयाच्या पत्रानंतर सप्तशृंगी संस्थानच्या पदभाराचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा

Saptashrungi Trust Appointment : उच्च न्यायालयाने निकालाची सत्यप्रत संबंधित शासकीय आणि न्यायिक यंत्रणांना पाठवून कार्यवाहीची विनंती केली आहे. पाच नवनियुक्त विश्वस्तांच्या पदभाराचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून भाविकांचे लक्ष पुढील प्रक्रियेकडे लागले आहे.
Saptashrungi Trust Appointment

Saptashrungi Trust Appointment

esakal

Updated on: 

वणी ( नाशिक) : श्री सप्तशृंग निवासिनी देवी संस्थानच्या नवनियुक्त पाच विश्वस्तांच्या नियुक्तीचा आणि पदभाराचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना, मुंबई उच्च न्यायालयाच्या अपिलेट विभागाने संबंधित शासकीय व न्यायिक यंत्रणांना पत्र पाठविले आहे. न्यायालयाच्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निकालाची सत्यप्रत पाठवून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यानंतर आता तरी उच्च न्यायालयाच्या पत्रानुसार पदभार सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार का, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...