Wani News : सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती; ग्रामस्थ आक्रमक!

High Court Stays Appointment of New Trustees : श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या नवीन विश्वस्त निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी 'पेसा' कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १६ मार्च रोजी विशेष ग्रामसभा बोलावली आहे.
Saptashrungi Temple

Saptashrungi Temple

sakal

Updated on: 

वणी: श्री सप्तश्रृंगी निवासिनीदेवी ट्रस्टच्या नवीन विश्वस्त मंडळाच्या पाच विश्वस्तांची जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जाहीर केलेली निवड उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. दरम्यान, या निवडीवर स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेत ‘पेसा’ कायद्याचे उल्‍लंघन झाल्याचा दावा करीत सोमवारी (ता. १६) ग्रामसभा बोलविली. तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com