

Nashik Food Safety News Action Against 13 Food Establishments at Saptashrungi Gad During Navratri Festival Inspection
esakal
वणी (वाशिक) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत १३ अन्न आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, १८ अन्न नमुने विश्लेषणासाठी संकलित करण्यात आले. तसेच असुरक्षित वातावरणात वाहतूक व साठवणूक केलेला आणि आवश्यक लेबल मजकूर नसलेला एकूण १ हजार ४०८.७ किलो पामतेलयुक्त मावासदृश्य मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे ५ लाख ६२ हजार ९० रुपये असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.