Nanduri road work
sakal
वणी: श्री सप्तशृंगी गड- नांदुरी घाट रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासह घाट लांबीतील संरक्षक भिंतींच्या कामाला गेल्या पाच महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी विलंब होत असून, सदर काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी सप्तशृंगी गड ग्रामस्थांकडून शुक्रवारी (ता.२८) रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे पत्र आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.