Accident
sakal
वणी: पिंपळगाव बसवंत येथील बिल्डींग बांधकाम साहित्याचे व्यावसायिक कीर्तिकुमार पटेल हे पत्नीसह सासू सासऱ्यांना इनोव्हा कारने वणी गडावर देवदर्शनासाठी घेऊन जात असताना मंकी पॉईटजवळील भवरीनाला भागात ओव्हरटेकच्या प्रयत्नात घाटाच्या संरक्षण भिंतीस धडक देत त्यांची कार सुमारे ९०० फूट दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तीन महिला व तीन पुरुषांचा मृत्यू झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सहाही जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यास यश आले आहे.