Saptashrungi Kojagari festival
sakal
वणी: लाखो भाविकांच्या उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... घुंगराचा छनछनाट व डफ-ताशांचा निनाद... अशा भक्तिमय वातावरणात सोमवारी (ता. ६) गडावर ‘कोजागरी’चा उत्साह होता. शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंच्या गर्दीने गड बहरून गेला होता.