ST Buses
sakal
वणी: आद्यस्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सव आणि कोजागिरी उत्सवात एसटी महामंडळाच्या कळवण आगाराने दोन लाख ५८ हजार ५९२ भाविक प्रवाशांची यशस्वीपणे वाहतूक करत सवलतीसह ८८ लाख ४४ हजार ५०८ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यंदा नवरात्रोत्सवात झालेल्या पावसाने गर्दीवर परिणाम केल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली असली, तरी कोजागरी पौर्णिमेच्या वाढलेल्या गर्दीने आगाराला काहीसा दिलासा मिळाला आहे.