Saptashrungi Temple Chaitra Festival, Nashik Temple News
esakal
Saptashrungi Temple Chaitra Festival : नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात (Saptashrungi Devi Temple) दरवर्षीप्रमाणे यंदाही होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. २६ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या चैत्रोत्सवादरम्यान मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.