Saptashrungi Gad Navratri Utsa
sakal
वणी: ‘सोहळा गाजतो तृतीया उषःकाळी, काकडा चौघडे वाजे जगदंबा जागती... पंचामृत गंध स्नाने माता तोषीली, शृंगार मांडुनी अष्टदशभुजा पुजिली...’ अशा स्तोत्रमधुर वातावरणात सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेस भाविकांचा महासागर उसळला. सुमारे तीस हजार भक्त माता भगवतीच्या चरणी नतमस्तक होत ‘जय अंबे’च्या घोषात सामील झाले.