idol conservation work started of saptashrungi devi temple wani latest marathi news
idol conservation work started of saptashrungi devi temple wani latest marathi newsesakal

आदिमायेच्या जयघोषात श्री सप्तशृंगीच्या मूर्ती संवर्धन कार्यास प्रारंभ

वणी (जि. नाशिक) : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील श्री भगवती स्वरूप / मूर्ती संवर्धन व देखभाल (Idol Conservation) कार्यास गुरुवार, ता. २१ पासून सुरुवात होत असून उद्यापासून पुढील ४५ दिवस आदिमायेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद राहाणार आहे.

दरम्यान आज( ता. २०) मूर्ती संवर्धनापूर्वीचे आवश्यक विविध धार्मिक विधी आदिमायेच्या जयघोषात व वेदमूर्ती पंडीतांच्या मंत्रघोषात संपन्न होवून मूर्ती संवर्धंन कार्यास प्रारंभ करण्यात आला आहे. (Saptsringi idol conservation work started nashik Latest Marathi News)

सप्तशृंगी मातेच्या स्वरुप व मूर्ती संवर्धन व मंदीर देखभालीच्या कामास नियोजनाप्रमाणे उद्या पासून प्रारंभ होत असून कामाच्या अनुंंगाने पुरोहित वर्गा मार्फत विविध धार्मिक पिठातील विद्वान, धर्मशास्त्र पारांगत श्री गणेश्वर शास्त्री (धर्म मार्तंड), द्रविड शास्त्री काशी आदींच्या मार्गदर्शनाने विधिवत धार्मिक कार्य व पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वर्धन पी देसाई व विश्वस्त श्री भूषणराज तळेकर यांच्या हस्ते व वेदमूर्ती श्री भालचंद्रशास्त्री सौचे, वेदमूर्ती श्री शांतरामशास्त्री भानुसे, महंत सुधीरदास पुजारी, पुजारी पंडित दिनेश गायधनी, पुजारी राहुल बेळे, पुजारी प्रणव पुजारी, जेष्ठ पुजारी प्रमोद दीक्षित, पुरोहित संघ अध्यक्ष धनंजय दीक्षित, समिती प्रतिनिधी श्री श्रीकांत दीक्षित व श्री शेखर देशमुख यासह पुजारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले असून त्याचा पूर्वार्ध आषाढ शुध्द पौर्णिमा बुधवार, दि. १३/०७/२०२२ प्रथम ग्रामदेवतेसह सर्व ग्राम देवतांना पान सुपारी, नारळ दक्षणा देवून कार्य सुरु करणेकामी विनंती करुन कार्यास येण्याचे निमंत्रण देण्यासह

श्री भगवतीची विशेष पंचामृत महापुजा करून अनुष्ठानास प्रारंभ करून अनुष्ठानात श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, कुंजीका स्तोत्र, देवी अथर्व शिर्ष व नवार्नव मंत्र जप सुरु करून आज आषाढ वद्य अष्टमी बुधवार, दि. २०/०७/२०२२ रोजी विनायक शांती होम, अदभूत शांती, अघोर होम, तेजोत्रारण (कलाकर्षण) इत्यादी निर्धारीत विधी संदर्भिय पुर्तता केली आहे. तसेच दि. २१/०७/२०२२ पासून प्रत्यक्ष श्री भगवती स्वरुप / मुर्ती देखभाल संबंधीत कार्यवाही सुरु असतांना १० हजार दुर्गासप्तसती पाठाचे वाचन करण्याचे नियोजन निर्धारीत केलेले आहे.

idol conservation work started of saptashrungi devi temple wani latest marathi news
प्रवेशातील विलंबाने विद्यार्थ्यांच्‍या पोटात गोळा; पालकांचीही वाढली चिंता

सदर धार्मिक कार्य प्रसंगी श्री श्री १००८ महामंडलेश्वर राष्ट्रसंत अनंत विभूषित सोमेश्वरानंद सरस्वती, श्री सिद्धेश्वराय सरस्वती, श्री नाथनंद सरस्वती, श्री रामानंद सरस्वती, योगी अवंतिकानाथ (जुनागड, गुजरात), श्री बन्सी महाराज (गुजरात), महंत श्री भारती महाराज, योगी श्री गोरक्षनाथ महाराज यांनी श्री भगवती दर्शन घेत धार्मिक कार्यास विशेष शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.

प्रसंगी कळवण - सुरगाणा विधानसभा सदस्य मा. आ. श्री. नितीन पवार हे धार्मिक विधी दरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहून श्री भगवती चरणी लिन झाले. प्रसंगी नियोजित श्री भगवती स्वरूप / मूर्ती संदर्भीय कामकाजाची आवश्यक ती माहिती जाणून कार्यास विशेष शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी त्याचे अध्यक्ष श्री वर्धन देसाई व विश्वस्त ऍड श्री ललित निकम यांनी यथोचित सत्कार केला. दरम्यान निफाड विधानसभा सदस्य मा. आ. श्री. दिलीप बनकर यांनी देखील श्री भगवतीचे दर्शन घेतले.

विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वर्धन पी देसाई, विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ऍड श्री ललित निकम, प्रकल्प समिती समन्वयक सौ. मनज्योत पाटील, डॉ. प्रश्नात देवरे, श्री भूषणराज तळेकर, व्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री भगवान नेरकर, अधीक्षक श्री प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी श्री भिकन वाबळे तसेच मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी कार्यालयीन व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा, मंदिर, उपकार्यालाय तसेच इतर विविध विभागाने विशेष परिश्रम घेतले.

idol conservation work started of saptashrungi devi temple wani latest marathi news
BSc Computerच्‍या परीक्षेत CETमुळे बदल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com